प्रेमाच्या ‘सरी’ची ‘संमोहिनी’ प्रेमाच्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणाऱ्या ‘सरी’ चित्रपटातील पहिलं ‘संमोहिनी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले आहे. आनंदी जोशी हिचा सुरेल आवाज लाभलेल्या या गाण्याचे संगीतकार अमितराज असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले …