no images were found
आसिफ शेख बनले कव्वाल
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है‘ विनोदी कथानकासह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच मालिकेमधील पात्र विनोदी स्थितींचा सामना करत प्रेक्षकांना अचंबित करत आहेत. आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा कव्वाल बनणार आहे, ज्यामधून अद्वितीय व उत्साहपूर्ण क्षणांचे मनोरंजन मिळेल. तसेच प्रेक्षकांना हास्य व मनोरंजनाचा आनंद मिळणार आहे.
या धमाल एपिसोडबाबत आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ”विभुती बाजारामध्ये दोन्ही हाताने एक डास मारतो. एक भिकारी विभुतीकडे येतो आणि कव्वाली गायकाप्रमाणे टाळ्या वाजण्यासाठी त्याचे कौतुक करतो. तो विभुतीला गाणे म्हणण्याची देखील विनवणी करतो आणि सांगतो की, तो एकेकाळी प्रख्यात कव्वाली गायक होता, तसेच तो विभुतीला कव्वालीचे प्रशिक्षण देण्याची ऑफर करतो. पण विभुती भिकाऱ्याला नकार देतो. घरी परतल्यानंतर विभुती डेव्हिड चाचाला (अनुप उपाध्याय) घडलेल्या घटनेबाबत सांगतो. डेव्हिड चाचा विभुतीला सांगतात की, अंगूरीला (शुभांगी अत्रे) कव्वाली आवडते. हे समजताच विभुती अंगूरीला प्रभावित करण्याचे ठरवतो. तसेच तो भिकारीकडून कव्वालीचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवतो आणि आपल्या टीममध्ये टिका (वैभव माथूर), टिलू (सलिम झैदी) व सक्सेना (सानंद वर्मा) यांना सामील करतो.”
आसिफ शेख विविध पात्र साकारण्यासाठी आणि चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. त्यांना ही भूमिका साकारण्याचा आनंद झाला आहे. ते म्हणाले, ”एपिसोडमधील माझ्या भूमिकेमध्ये विविध घटक सामावलेले आहेत, जे पाहून प्रेक्षक हसून-हसून लोटपोट होतील. सुरूवातीला मला योग्य परफॉर्मन्स करण्यासाठी राग, लय व ताल यांचे योग्य संतुलन राखण्यामध्ये संघर्ष करावा लागला. पण, मी यूट्यूबवर अनेक कव्वाली व्हिडिओ पाहत या आव्हानावर मात केली. या तालीमेमुळे माझा परफॉर्मन्स उत्तम झाला. मी सेटवर परिपूर्णपणे ‘मेहफिल‘ तयार करण्यासाठी टीमचे कौतुक करतो, ज्यामध्ये योग्य लायटिंग, पडदे व संगीत वाद्यांचा योग्यरित्या वापर करण्यात आला. आम्ही विविध गाण्यांवर तालीम करताना, तसेच हार्मोनियम व तबला असे संगीत वाद्ये वाजवताना खूप धमाल केली. नवीन व उत्साहवर्धक कन्टेन्टसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आमचे सातत्यपूर्ण ध्येय आहे. आम्ही खूप विचार केल्यानंतर हे ध्येय साध्य करतो, तसेच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अद्भुत व मनोरंजनपूर्ण पात्र तयार करतो.”