no images were found
ह्युंदाई मोटर इंडियाने महाराष्ट्र सरकारला 46 व्हेन्यू एसयूव्ही सुपूर्द केल्या
पुणे : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल), भारतातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्स प्रदाता आणि स्थापनेपासून प्रवासी कारची सर्वात मोठी निर्यातदार, ने 46 ह्युंदाई व्हेन्यू, आरोग्य विभाग, महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द केली आहेत. या एसयूव्ही महाराष्ट्राचे माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री, प्रोफेसर (डॉ.) तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉल, पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान देण्यात आल्या. यावेळी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे वेस्ट झोनचे झोनल बिझनेस हेड श्री उमेश नारायण चंद्रात्रे, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या वेस्ट झोनचे झोनल बिझनेस कोऑर्डिनेटर श्री टी.के. सोन आणि सोमानी ह्युंदाई चे डीलर प्रिन्सिपल श्री केतन सोमाणी हे देखील उपस्थित होते.
श्री उमेश नारायण चंद्रात्रे, झोनल बिझनेस हेड – वेस्ट झोन ह्युंदाई मोटर इंडिया लि., या समारंभावर बोलताना म्हणाले, “एचएमआयएल, महाराष्ट्र सरकारला ’46 ह्युंदाई व्हेन्यू एसयूव्ही प्रदान करून त्यांच्या गतिशीलतेच्या गरजा पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल सन्मानित आहे. ही वाहने महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला सेवा देतील. ह्युंदाई व्हेन्यू, स्पेशियस इंटिरिअर्स आणि क्लास-लिडिंग कंफर्ट, कन्व्हिनियन्स आणि सेफ्टी वैशिष्ट्ये देते, ज्यामुळे ती पहिली पसंती आहे. ह्युंदाई व्हेन्यू ची मोबिलिटी पार्टनर म्हणून निवड केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.”
ह्युंदाई मोटर इंडिया ने अलीकडेच ‘स्मार्ट सेन्स’ एडीएस (ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंस सिस्टम) सह व्हेन्यू अपडेट केले आहे, ज्यामुळे ती या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली भारतातील सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे. एडीएएस सह, व्हेन्यू ची ड्रायव्हिंग, सेफ्टी आणि सुविधा पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे.