no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पूर्वाश्रमीचा पती दिलीप पटेल परत आल्यामुळे पुष्पाच्या आयुष्यात उठले भावनिक वादळ
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल‘ मालिकेत पुष्पा ही (करुणा पांडेय) खंबीर व्यक्तिमत्त्वाची भूमिका चितारण्यात आली आहे. सकारात्मकता आणि अडचणी सोडवण्याच्या स्वभावाच्या माध्यमातून ती दैनंदिन आयुष्यातील आव्हानांचा सामना करत असते. मालिकेच्या अलीकडील भागांत आपण पाहिले की, बापोदरा (जयेश बारभया) हे तानाबाना वर्कशॉपमध्ये दिलीप (जयेश मोरे) यांना राहू देण्यास नकार देतात. यामुळे त्यांच्याकडे राहण्यासाठी इतर कुठलीच जागा उरत नाही.
आता मालिकेतील आगामी भागांत आपण पाहणार आहोत की, पुष्पाच्या आयुष्यात आणखीच नवीन संकट निर्माण होते जेव्हा प्रार्थनाच्या (इंद्राक्षी कांजीलाल) तणावग्रस्त विवाहाच्या मुद्द्यावरून तिचा अश्विन (नवीन पंडिता), चिराग (दर्शन गुर्जर) यांच्यासोबत वाद होतो. दरम्यान, तिचा मुख्य पाठीराखा जुगल (अंशुल त्रिवेदी) हा घरी परतणार असतो. आता दुसरी कुठलीही वाट नसल्यामुळे पुष्पा मोठ्या अनिच्छेनेच दिलीप यांना घरी घेऊन येते. परिणामी आणखी एका विषयाला तोंड फुटते. तिचा पूर्वाश्रमीचा शिवराळ नवरा पुष्पाच्या घरातील नाजूक संतुलनाचा भंग करतो. त्या व्यक्तीचा ती सर्वात जास्त तिरस्कार करत होती, आता त्याच्यासोबतच एका छताखाली राहताना ती कशाप्रमाणे मन खंबीर करते, हे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
मालिकेत पुष्पाची भूमिका साकारणारी अभिनेत्री करुणा पांडेय म्हणाली की, “आताच्या क्षणी पुष्पा ही अनेक आव्हानात्मक भावनांतून जात आहे. ती सध्या तिचा भूतकाळ आणि वर्तमानकाळात अडकलेली आहे. आगामी काही भागांत पुष्पाची एक वेगळीच बाजू पाहायला मिळणार आहे. यातून तिची आत्मशक्ती आणि ती कशा पद्धतीने आयुष्यातील खडतर आव्हानांना सामोरी जाते, हे पाहायला मिळेल. एक कलाकार म्हणून पुष्पाच्या व्यक्तीरेखेमधील अशा गहिऱ्या भावना साकारायला मिळणे हे माझ्यासाठी खूप काही शिकवणारे होते. पुष्पातील खंबीरतेचा शोध घेण्याचा हा प्रवास खूप तीव्र भावनांनी भरलेला पण सर्जनशीलता म्हणून तितक्याच मोठ्या प्रमाणात समृद्ध करणारा राहिला आहे. आपल्या सर्वांत सामावलेल्या अद्वितीय सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून मालिकेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.”