
no images were found
विकसित भारत संकल्प यात्रेत 11450 नागरिकांची उपस्थिती
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेची सुरुवात शहरात दि.9 डिसेंबर 2023 पासून झाली आहे. या अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत केंद्र शासनाच्या विविध योजनेसाठी 3406 लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 231, पी.एम.स्वनिधी साठी 541, आयुष्यमान भारत कार्ड साठी 790 लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. उज्वल योजनेत 148 तर आरोग्य विभागाच्या हेल्थ कॅम्पमध्ये 1696 नागरीकांनी आपली तपासणी करुन घेतली आहे. या संकल्प यात्रेच्या ठिकाणी आजअखेर 10050 नागरीकांनी उपस्थिती लावली. ही संकल्प यात्रा शहरातील विविध भागात दि.19 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.
गुरुवार, दि.14 डिसेंबर 2023 रोजी सोन्यामारुती चौक व गंगावेश, शुक्रवार, दि.15 डिसेंबर 2023 रोजी रंकाळा तलाव व सदरबाजार,शनिवार, दि.16 डिसेंबर 2023 रोजी सासने मैदान व शाहू मार्केट यार्ड, रविवार दि.17 डिसेंबर 2023 रोजी फुलेवाडी व उभा मारुती चौक, सोमवार दि.18 डिसेंबर 2023 रोजी नागाळा पार्क व रमणमळा चौक, मंगळवार दि.19 डिसेंबर 2023 रोजी हुतात्मा पार्क चौक व उद्यमनगर याठिकाणी घेण्यात येणार आहे.