Home औद्योगिक माया टाटा’ सांभाळणार टाटा समूहाची धुरा;!

माया टाटा’ सांभाळणार टाटा समूहाची धुरा;!

4 second read
0
0
17

no images were found

‘माया टाटा’ सांभाळणार टाटा समूहाची धुरा;!
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे अविवाहित असल्याने, त्यांचे अब्जावधींच्या साम्राजाचे पुढे काय होणार? ते कोणाला मिळणार? याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित होतो. मात्र, आता ३४ वर्षीय माया टाटा या टाटा समूहाची लवकरच धुरा सांभाळू शकतात. माया टाटा या रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि अलू मिस्त्री यांची कन्या आहेत.
भारतात रतन टाटा यांच्या नावाला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले आहे. रतन टाटा यांच्या अब्जावधींचा व्यवसाय आहे. अगदी मिठापासून ते विमानापर्यंत टाटा समूहाने आपला व्यवसाय विस्तार केला आहे. मात्र, आता रतन टाटा यांच्यानंतर त्यांचा हा संपूर्ण व्यवसायाचा गाडा कोण चालवणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. मात्र, आता 34 वर्षीय माया टाटा या देशातील सर्वात प्रभावी व्‍यापार‍ी साम्राज्यांपैकी असलेल्या टाटा समूहाच्या साम्राजाची धुरा सांभाळणार आहे. झगमगाटाच्या दुनियेपासून त्या नेहमीच दूर असतात.
माया टाटा या रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि अलू मिस्त्री यांची कन्या आहेत. अलू या अब्जाधीश पालोनजी मिस्त्री यांच्या कन्या आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची बहीण आहे. सायरस यांच्या एका कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. मिस्त्री कुटुंबाचा सायरस इंव्हेस्टमेंट्स प्रायव्हेट आणि स्टर्लिंग इंव्हेस्टमेंट ग्रुपच्या माध्यमाने टाटा सन्समध्ये जवळपास 18.4 टक्के वाटा आहे. अशा प्रकारे मायाचे टाटांसोबत दुहेरी नाते तर आहेच. याशिवाय, यामुळेच येणाऱ्या काळात ती टाटा समूहाला लीड करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
माया टाटा यांनी ब्रिटनच्या बेयस बिझनेस स्कूल आणि वारविक विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. ती नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन टाटा यांची नात आहे. सोमन नोएल टाटा यांची आई आणि रतन टाटा यांची सावत्र आई आहे. माया यांनी टाटा कॅपिटलची सहकारी कंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. माया यांनी फंडमधील कॉर्पोरेट जगतातील जटिल डायनॅमिक्‍स समजून घेताना पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार संबंधांसंदर्भातील आपले कौशल्य आणखी चांगले केले आहे.
हल्ली टाटा समूहात मायाचा प्रभाव वाढत आहे. माया हळू हळू मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची तयारी करत आहेत. मायाची सूक्ष्म पण, प्रभावी उपस्थिती तिला टाटा साम्राज्याचा भविष्यातील एक मुख्य लीडर म्हणून समोर आणते. टाटा सन्सच्या एजीएममध्ये मायाची भूमिका बघितल्यानंतर, भविष्यात समूहाची धुरा माया टाटाच्या हाती गेल्यास फार आश्चर्य वाटायला नको. असे सांगितले जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…