Home शैक्षणिक राज्यस्तरीय शालेय शुटींग स्पर्धेचे उदघाटन संपन्न

राज्यस्तरीय शालेय शुटींग स्पर्धेचे उदघाटन संपन्न

7 second read
0
0
47

no images were found

राज्यस्तरीय शालेय शुटींग स्पर्धेचे उदघाटन संपन्न

कोल्हापूर :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय 14, 17, 19 वर्षे मुले व मुली शुटींग स्पर्धेचे दिनांक 12 ते 15  डिसेंबर, 2023 या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर, कोल्हापूर येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. माणिक पाटील, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर हे उपस्थित होते. श्रीमती राधिका बराले आंतरराष्ट्रीय शूटिंग खेळाडू व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी या प्रमुख पाहुण्या होत्या. स्पर्धा उद्घाटन प्रसंगी श्री. रमेश कुसाळे – सचिव, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मेन अँड वुमन रायफल असोसिएशन कोल्हापूर, श्री. अजित पाटील, आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक, श्री. सचिन चव्हाण, आंतरराष्ट्रीय खेळाडू व तालुका क्रीडा अधिकारी, श्री. संदीप तरटे, आंतरराष्ट्रीय खेळाडू, व क्रीडा मार्गदर्शक, श्री. सौरभ साळवणे, महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशनचे प्रतिनिधी, श्री. शिवतेज खराडे- राष्ट्रीय खेळाडू या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

आपल्या प्रस्ताविकामध्ये श्रीमती नीलिमा अडसूळ,  जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर यांनी शूटिंग स्पर्धेची सविस्तर माहिती विषद केली. सर्व मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.  समर्थ मंडलिक या राष्ट्रीय खेळाडूंने उपस्थित खेळाडूंना शपथ देण्यात आली. श्रीमती राधिका बराले, प्रमुख अतिथी यांनी खेळाडूंनी कितीही अडथळे आले तरी आपला सराव न सोडता तो नियमित ठेवावा, असे सांगत सर्व खेळाडूंना स्पर्श करिता शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री. माणिक पाटील यांनी विभागीय क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटींग रेंज सरावासाठी सर्वांना उपलब्ध असून  जिल्ह्यातील खेळाडूंनी त्याचा लाभ घेण्याबाबत  आवाहन केले.  कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अभय देशपांडे, तालुका क्रीडा अधिकारी यांनी आभार व्यक्त केले.  कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी श्रीमती रोहिणी मोकाशी, श्रीमती मनीषा पाटील,  श्री. सुधाकर जमादार, श्री. कृष्णात पाटील, श्री. प्रवीण कोंडावळे, श्री. साताप्पा पाटील,  श्री. विकास दळवी , श्री. सुकुमार पाटील यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी पाटील यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …