Home शैक्षणिक आर.एस.इ.एम.एस. (RSEMS)ग्लोबल शाळेची मुले अनुभवत आहेत हस्तकला कार्यशाळा

आर.एस.इ.एम.एस. (RSEMS)ग्लोबल शाळेची मुले अनुभवत आहेत हस्तकला कार्यशाळा

8 second read
0
0
25

no images were found

आर.एस.इ.एम.एस. (RSEMS)ग्लोबल शाळेची मुले अनुभवत आहेत हस्तकला कार्यशाळा

कोल्हापूर  :  ‘हस्तकला केंद्र’, कोल्हापूर, वस्त्र उद्योग मंत्रालय, केंद्र शासन तर्फे तीन दिवसीय हस्तकला कार्यशाळा आर.एस्.इ.एम्.एस्- ग्लोबल शाळेत संपन्न झाली. त्यामधे भरतकाम, मातीकाम, वारली चित्रकला, पॅचवर्क, दागिने तयार करणे व वायरचे बास्केट विणणे या कलांच्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पूरक अशा कलांमधून विद्यार्थ्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. कार्यशाळेअंतर्गत इयत्ता ८वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकला, भरतकाम, मातीकाम यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये सुमारे १०० मुलांनी सहभाग घेतला व त्यातील विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या इयत्तावार तीन विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

 

विजेते विद्यार्थी- वारली चित्रकला- इयत्ता ८वी तृप्ती चव्हाण, श्रेणीक सुतार, प्रांजली पाटील

इयत्ता ९ वी -अन्वी पाटील, शंभवी अवळकर, प्रांजली पाटील

भरतकाम- इयत्ता ८वी- तन्वी देसाई, श्रेया कामते, मिस्बा मुल्ला

 इयत्ता ९ वी आयुष सांगरुळकर, प्रियांका साळुंखे, श्रीजनी कोंडुस्कर

मातीकाम- नंदराज वाडकर, सूचित कनमाडी, शिवराज चौगुले.

प्राचार्य, जयदेव रॉय, वरीष्ठ उपसंचालक, हस्तकला केंद्र कोल्हापूरचे चंद्रशेखर सिंग यांच्या हस्ते बक्षिस समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व कार्यशाळेबद्दल आपले मत व्यक्त केले. समारंभास उपप्राचार्य उर्मिला शिंदे, अॅड मिनिस्ट्रेटरक सौ. रंजना कुबेर, शाळेचे विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा ढेरे यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…