Home मनोरंजन महाअंतिम सोहळ्यात रंगणार महाजुगलबंदी

महाअंतिम सोहळ्यात रंगणार महाजुगलबंदी

0 second read
0
0
159

no images were found

२१ ऑगस्टला रंगणार मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचाचा महाअंतिम सोहळा

गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना त्यांचं टॅलेण्ट सिद्ध करता यावं यासाठी हक्काचा मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा. वयाचं बंधन नसल्यामुळे अगदी ४ वर्षाच्या चिमुरड्यापासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या गायकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील २ सर्वोत्तम गायक आणि २ ग्रुप्सनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या २१ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार याची उत्सुकता वाढली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…