no images were found
ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीत पक्षपातीपणा !
कोल्हापूर – वर्ष 2015 ते 2021 या 7 वर्षांच्या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केले म्हणून 230 खटले दाखल केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ 22 खटले दाखल आहेत, असे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यातील एकूण 252 खटल्यांपैकी 230 खटले हे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव साजरे करणारी मंडळे, संघटना अथवा कार्यकर्ते यांच्यावरच झालेले दिसतात. 22 खटले हे मुसलमानांच्या संदर्भातील असले, तरी त्यातील सर्वच गुन्हे मशिदींबाबत आहेत, असे नाही. एकूणच 92 टक्के गुन्हे हे हिंदूंवर आणि 8 टक्के गुन्हे हे मुसलमानांवर दाखल झालेले आहे. हा कारवाईमध्ये सरळसरळ पक्षपात केला जात आहे. भारतीय राज्यघटनेनुसार नियम-कायदे सर्वांना सारखे असतांना हा पक्षपात इतके वर्षे का केला जात आहे ? मुसलमान विशेष नागरिक असल्याने त्यांना कायद्यात सूट दिली आहे का ? याचा अर्थ वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते असे प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगते आणि दुसरीकडे अन्य धर्मियांवर मात्र कायदा मोडला जात असून कोणतीही कारवाई होत नाही ! तरी केवळ हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा गैरवापर करणार्या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित करून कारवाई करावी, तसेच बकरी ईद, मोहरम आणि अन्य धर्मिय वा पंथीयांच्या सण-उत्सवांच्या वेळी होणार्या प्रदूषणाविषयी अभ्यासपूर्ण अहवाल तयार करावेत आणि ते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, अशी मागणी या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केली. या प्रसंगी बाल हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष चौगुले, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाउपप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. आदित्य शास्त्री उपस्थित होते.