no images were found
सुजित चव्हाण, रवींद्र माने जिल्हाप्रमुख
राजेश क्षीरसागर आणि खासदार माने यांनी केली घोषणा
कोल्हापूर : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सुजित रामभाऊ चव्हाण आणि इचरकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांच्या नावाची घोषणा हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यात शिवसेनेतील झालेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणा सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, आणि करवीर विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुख पदी सुजित चव्हाण यांची निवड झाली. हातकलंगले, शाहूवाडी, शिरोळ, पन्हाळा, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघानुसार इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली. खासदार माने आणि राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या नियुक्तीची पत्रे दोघांकडे सपू्र्त केली.