
no images were found
शिवसेनेकडून वाल्मीक कराडच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
कोल्हापूर (प्रतिनिधी):-बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडच्या पोस्टरला आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार शिवसेना कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाल्मिकी कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच वाल्मीक कराडला फाशी द्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. बीड येथील मस्साजोगचे संतोष देशमुख यांची निर्दयी हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील आरोपींचे त्याच्या साथीदारांचे हत्याकांडाप्रसंगी चे काही फोटो व्हायरल झाले आहेत, यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे. तसेच या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज या निर्घृण हत्येचा निषेध म्हणून आणि आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आज शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ” वाल्मीक कराड कोण रे,पायतान मारा दोन रे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच या प्रकरणी कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाऊ नये अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, रणजीत मंडलिक, दीपक चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, अंकुश निपाणीकर, निलेश गायकवाड, प्रभू गायकवाड, अल्लाउद्दिन नाकाडे, मंदार पाटील, कुणाल शिंदे, गजानन भुर्के, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पूजा भोर, मंगलताई कुलकर्णी, गौरी माळतकर, नम्रता भोसले, सौरभ कुलकर्णी, सुरेश माने, किरण पाटील, श्रीकांत मंडलिक, कपिल सरनाईक, विश्वजीत चव्हाण, शुभम शिंदे, कपिल पोवार, मेघराज लुगारे आदी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.