no images were found
उद्यापासून महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन – जिल्हाधिकारी राहुल रेखावर
कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल विभागाकडून 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल सप्ताहामध्ये 1 ऑगस्ट रोजी “महसूल दिन साजरा करण्याबरोबरच महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महाराजस्व अभियानामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन विभागनिहाय उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.
2 ऑगस्ट रोजी “युवा संवाद हा उपक्रम राबविण्यात येणार असून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांनी दाखल केलेले प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. जिल्हयातील माध्यमिक शाळा महाविद्यालय इ. मध्ये इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी व १२ वी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र व इतर क्षेत्रातील संस्थेमध्ये प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे “माहितीपत्रक” प्रसिध्द करुन त्यांचे सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. 3 ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचे विमा उरविण्यासाठी अर्जदारांच्या मागणीनूसार, पिक पेरा अहवाल, सात बारा व ८ अ असे तलाठी स्तरावरुन देय असलेले विविध दाखले देण्यात आलेले आहेत. 4 ऑगस्ट रोजी “जनसंवाद उपक्रम” राबविण्यात येणार आहे. यामध्ये जमिनीविषयक आवश्यक असणाऱ्या नोंदी अद्यावत करुन तलाठी मंडल अधिकाऱ्यामार्फत अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन तक्रारी निकाली काढण्यात येणार आहेत.
5 ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 6 ऑगस्ट रोजी “संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद आयोजित करण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी “महसूल सप्ताह सांगता समारंभ महसूल यंत्रणेमार्फत सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेवून महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ करण्यात येणार आहे.