Home शासकीय 2 ते 19 ऑगस्ट पर्यंत मोफत डोळे व मोतीबिंदु तपासणी शिबीर

2 ते 19 ऑगस्ट पर्यंत मोफत डोळे व मोतीबिंदु तपासणी शिबीर

1 second read
0
0
29

no images were found

2 ते 19 ऑगस्ट पर्यंत मोफत डोळे व मोतीबिंदु तपासणी शिबीर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरीकांसाठी दि.2 ऑगस्ट ते दि.19 ऑगस्ट 2023 या कालावधीत मोफत डोळे व मोतिबिंदु तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत विविध ठिकाणी घेण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र १ सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे बुधवार दि.२ ऑगस्ट २०23 रोजी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र २ फिरंगाई येथे दि.3 ऑगस्ट २०23 रोजी, प्राथमिक नागरी आरोग राजारामपुरी येथे दि.5 ऑगस्ट २०23 रोजी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र ४ श्री पंचगंगा रुग्णालय येथे दि.7 ऑगस्ट २०23 रोजी रोजी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र ५ कसबा बावडा येथे दि.8 ऑगस्ट २०23 रोजी, नागरी आरोग्य केंद्र ६ महाडीकमाळ येथे दि.10 ऑगस्ट २०23 रोजी, प्राथमिक नागरी आरोग्य आयसोलेश्यान येथे दि.11 ऑगस्ट २०23 रोजी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र ८ फुलेवाडी येथे दि.11 ऑगस्ट २०23 रोजी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र ९ सदर बझार येथे दि.14 ऑगस्ट २०23 रोजी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र १० सिध्दार्थ नगर येथे दि.18 ऑगस्ट २०23 रोजी व प्राथमिक नागरी केंद्र ११ मोरे-माने नगर येथे दि.19 ऑगस्ट २०23 रोजी घेण्यात येणार आहे. हे शिबीर कोल्हापुर महानगरपालिका व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांचे संयुक्त घेण्यात येणार आहे. तरी या शिबीराचा जास्ती जास्त नागरीकांनी लाभा घ्यावा असे अवाहन अति-आयुक्त केशव जाधव यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…