no images were found
पंचगंगा रुग्णालय आजपासून पुर्ववत सुरु
कोल्हापूर : जिल्हयामध्ये संततधार पावसामुळे शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे शुक्रवार पेठ येथील महापालिकेचे श्री पंचगंगा रुग्णालय हे पूर प्रभावित क्षेत्रामध्ये येते असलेने संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन तात्पुरत्या स्वरुपात मंगळवार दि.25 जुलै 2023 पासून बंद करण्यात आले होते. सोमवार दि.31 ऑगस्ट 2023 रोजी पुराचे पाणी कमी झाल्याने पंचगंगा रुग्णालय आजपासून पुर्ववत रुग्णांसाठी सुरु करण्यात आले आहे.