
no images were found
सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम
कोल्हापूर : सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी महासैनिक दरबार हॉल व लॉन, लाईन बझार रोड, कोल्हापूर येथे सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी दिली आहे.
कार्यक्रमास कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.