no images were found
अण्णा भाऊ साठे जयंती व्याख्यान व परिसंवाद
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ व २ ऑगस्ट, २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १ ऑगस्ट रोजी, सकाळी १०.३० विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये मा. कुलगुरू यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर ११.०० वाजता डॉ. बाबुराव गुरव (तासगाव) यांचे ‘अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय आणि विचारविश्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच, शाहीर
रणजित आशा अंबाजी कांबळे आणि सहकारी यांचा प्रबोधनपर शाहिरी सादरीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे भूषविणार आहेत. या प्रसंगी मा. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
२ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय : पुनर्शोधाच्या दिशा’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयीन कार्य आणि विचारविश्वाकडे जात, वर्ग, भटक्या विमुक्त जमाती संदर्भातील जाणिव व स्त्री जाणिवांच्याकडे आजची तरुणाई कसे बघते याचा शोध या परिसंवादाच्या निमित्ताने घेतला जाणार आहे. यामध्ये परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून कवी व लेखक अजय कांडर (कणकवली) तर, सोमनाथ कदम (सावंतवाडी), सुनीता बोर्डे (सांगली), प्रकाश नाईक (सरुड) व निरंजन फरांदे (सातारा) हे वक्ते सहभागी होणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात संपन्न होणार
आहेत. तरी सर्व वाचक, अभ्यासकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.