no images were found
अनाथ बालकांसाठी 2 व 3 ऑगस्टला मेळावा
कोल्हापूर : जिल्ह्यातील अनाथ बालकांना अनाथ आरक्षणाचा लाभ घेता यावा व बाल संगोपन योजनेपासून बालक वंचित राहू नये यासाठी तालुकास्तरावर दि. 2 ऑगस्ट रोजी करवीर, भुदरगड, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, शिरोळ व दि. 3 ऑगस्ट रोजी कागल, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयांमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. अनाथ बालकांनी व त्यांच्या पालकांनी 2 व 3 ऑगस्ट रोजी त्या-त्या मेळाव्याच्या ठिकाणी परिपुर्ण कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.
अनाथ बालकांना नोकरी व शिक्षणामध्ये 1 टक्के आरक्षण त्याचबरोबर बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. अनाथ बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या-त्या तालुक्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या होत्या. मेळाव्यास उत्पन्न दाखल्यासाठी तहसिल विभागातील प्रतिनिधी व आधार नोंदणी करीता आधार नोंदणी मशिन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांनी करवीर पंचायत समिती कार्यालय येथे अर्ज सादर करावेत, असेही श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.