no images were found
मानवता हाच हिंदू धर्माचा मूळ पाया – मयूर कुलकर्णी
कोल्हापूर (प्रतिनिधी ) – मानवता हाच हिंदू धर्माचा मूळ पाया आहे, अशा ओघवत्या शैलीत आणि रसाळ वाणीने मयूर कुलकर्णी यांनी भक्तांना आज मंत्रमुग्ध केले.
अधिक श्रावण महिन्याच्या निमित्ताने व्हीनस कॉर्नर येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्टच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सुरवात झाली. त्यामध्ये पहिले पुष्प वाहताना श्री. कुलकर्णी यांनी देव, देश आणि धर्म यासाठी झटणे हीच ईश्वरसेवा असल्याते सांगत रसाळ आणि ओघवत्या वाणीत धर्माचे मूळ तत्वज्ञान आणि भागवताची सुरवात, गोकर्ण उपाख्यान, देव म्हणजे काय आणि अनेक संकल्पनांचे उदाहरणाच्या माध्यामातून शंका निरसन केले. त्यामध्ये भक्तगण तल्लीन होऊन गेले. उद्या निरुपण होईल.
दरम्यान, सकाळी ९.३० वाजता देवता स्थापन, ध्वजारोहण, तुळशी पूजन, गोपूजा, दुपारी १.३० वाजता वाद्यांच्यासह राधाकृष्ण मंदिर येथून भागवत यात्रा काढण्यात आली. सायंकाळी ७.३० वाजता आरती झाली.
राजस्थानी महिला मंडळ आणि लक्ष्मी नारायण युवा मंचचे यासाठी सहकार्य लाभले आहे. १९ वर्षांनी आलेल्या श्रावण मासानिमित्त आयोजित भागवत कथेच्या श्रवणाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्रीनिवास मालू यांनी यावेळी केले.
उपाध्यक्ष मनीष झंवर, सचिव राजेंद्र शर्मा, सदस्य संजय दायमा, योगेश मोदी व पुजारी विष्णुदास दायमा यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
आजचे कार्यक्रम – कथा वाचन दुपारी ३.३०, आरती सायंकाळी ७.३०