गाभ चित्रपटाची टोरांटो, नेवाडा चित्रपट महोत्सवात निवड; कोल्हापूरच्या कलाकृतीचा गौरव कोल्हापूर – वेगळे कथानक आणि आशय असणाऱ्या गाभ चित्रपटाची टोरांटो आणि नेवाडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांची आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. …