Home मनोरंजन स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार

स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार

4 second read
0
0
22

no images were found

स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार

मुलींचं आयुष्य अनेकदा इतक्या नाजूक वळणावर असतं की त्यांना प्रत्येक पाऊल सांभाळून उचलावं लागतं. मग ते वयात येणं असो शिक्षण असो नोकरी/नोकरीच्या निमित्ताने दुस-या ठिकाणी जाणं असो किंवा संसार असो. ब-याच मुली स्वत:च्या जबाबदा-या सांभाळून स्वत:चं आयुष्य देखील सुरळितपणे चालवत असतात पण नेमकं असं काही घडतं की ज्यामुळे आयुष्यापुढे मोठा प्रश्न उभा राहतो. असंच काहीसं घडलंय ‘सन मराठी’ वरील ‘नवीन जन्मेन मी…’ या मालिकेतील स्वानंदीच्या बाबतीत.

आयुष्य आनंदाने जगणा-या आणि इतरांचं जीवन आनंदाने फुलवणा-या स्वानंदीचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. एका पार्टीत स्वानंदीच्या बाबतीत अघटित घटना घडली आणि त्यानंतर तिच्यासमोर एक भयंकर प्रश्न उभा राहिला की तिच्या होणा-या बाळाचा बाप कोण? या सगळ्या गोष्टींना मी कशी सामोरी जाणार या विचारांनी जरी स्वानंदीला घेरलं असलं तरी नियतीच्या कचाट्यात अडकलेली स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार आणि सत्याच्या संघर्षात स्वत: पुन्हा नव्याने घडणार.

स्वत: मध्ये असलेली जिद्द, धमक यामुळे स्वानंदी तिचा हा अडचणीचा रस्ता हिमतीने पार करणार हे नक्की. स्वानंदीच्या आयुष्याचा नवा प्रवास अनुभवण्यासाठी, पाहा ‘नवीन जन्मेन मी…’ मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता फक्त सन मराठी वर. स्वानंदीला तिच्या खडतर प्रवासात मिळणार मणीची साथ.पाहा ‘नवी जन्मेन मी…’ मालिका सोम ते शनि संध्याकाळी ७:३० वाजता फक्त आपल्या आपल्या सन मराठीवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…