no images were found
परिवा प्रणतीने लिहिले ‘वागले की दुनिया’ मालिकेचे काही एपिसोड
भारतीय टेलिव्हिजनच्या प्रचंड पसाऱ्यात सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ ही मालिका सामान्य माणसाच्या दैनंदिन आनंदाची आणि विवंचनांची कथा सांगणारी मालिका म्हणून उठून दिसते. सुमारे 900 एपिसोडमध्ये 600 पेक्षा जास्त कथा सादर करून या मालिकेने दैनंदिन घटनांना कथेचा बाज देऊन मालिकेत सामावून घेण्याच्या कौशल्यावर प्रभुत्व मिळवले आहे.अर्थात इतका प्रदीर्घ काळ चाललेल्या मालिकेत कथानकांचा ताजेपणा टिकवून ठेवणे हे काही सोपे काम नाही. पण कथेच्या संकल्पनेपासून कलाकारांपर्यंत सर्व बाबतीत नावीन्यपूर्णता ठेवून या मालिकेने ही कामगिरी करून दाखवली आहे.
आता मालिकेच्या शिरपेचात आणखी एक नवीन तुरा खोवला जात आहे. या मालिकेत चिवट स्वभावाच्या वंदना वागलेची भूमिका करणाऱ्या परिवा प्रणती या अभिनेत्रीने मालिकेसाठी लिखाणाचे काम हाती घेतले आहे. सध्याचे व्हॅलेंटाईन कथानक तिच्याच लेखणीतून उतरले आहे, ज्यात विवान आणि कॅरन यांच्यात निवड करण्याच्या पेचात सखी सापडली आहे. आपल्या लिखाणातून परिवाने कोवळ्या वयातील प्रेमाची गुंतागुंत, भावना आणि दुविधा दाखवून सर्व वयांच्या प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. हे व्हॅलेंटाईन कथानक उलगडत जाईल तेव्हा परिवाच्या क्रिएटिव्ह स्पर्शामुळे किशोरावस्थेतील रोमान्सचे चढ-उतार अनुभवत असलेल्या सखीच्या प्रवासाला एक खोली प्राप्त होईल.
वंदना वागलेची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल, पण या आधी देखील मी वागले की दुनिया मालिकेसाठी दोन गोष्टी लिहिल्या आहेत. नव्या कल्पना आणि नव्या दृष्टीकोनांविषयीच्या या मालिकेच्या मोकळेपणाने मला लेखन होण्याची मोकळीक दिली आणि यातील अनेक कथांमध्ये भर घालण्याची मलाही संधी दिली. सध्या जी व्हॅलेंटाईनशी संबंधित कथा सुरू आहे, त्या कथेचे माझ्या मनात एक खास स्थान आहे. यामध्ये असे अनुभव सांगितले आहेत, जे आपण सर्वांनी कधी ना कधी स्वतः अनुभवले आहेत. व्हॅलेंटाईन डे ला वातावरण प्रेमाने भारलेले असते. पण मला लोकांना हे देखील सांगायचे होते की, आपल्या स्वतःच्या सोबतीचा आनंद देखील आपल्याला घेता यायला हवा. त्यामुळे आपण एकटेच असलो, तरी हिरमुसून जाऊ नये. सखीच्या प्रेमत्रिकोणातून किशोरावस्थेतील रोमान्समधील गुंतागुंत स्पष्ट दिसते. माझे लिखाण आणि हे कथानक याबद्दल प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय आहे, हे बघण्यास मी उत्सुक आहे.”