Home Uncategorized शिरोली येथील दोन मार्बल दुकाने आगीच्या भक्षस्थानी

शिरोली येथील दोन मार्बल दुकाने आगीच्या भक्षस्थानी

1 second read
0
0
170

no images were found

शिरोली येथील दोन मार्बल दुकाने आगीच्या भक्षस्थानी

कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील कोल्हापूर-सांगली रोडवर असलेल्या मार्बल लाईन मधील दोन मार्बल दुकानाना आज  भीषण आग लागली. यामध्ये मार्बल दुकानातील कोट्यावधीचे साहित्य जळून खाक झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोलीतील मार्बल लाईन मध्ये असलेल्या इंगळे सिरॅमिक्स या दुकानाला आज पहाटे आग लागली. पहाटेच्या निरव शांततेत उडालेल्या आगीच्या भडक्याने त्वरित रौद्ररूप धारण केले. आग पाहणाऱ्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळवले.या ठिकाणी अग्निशामक दलाचे पथक एका बंबासह दाखल झाले. पण मोठ्या प्रमाणात पसरलेली आग एका बंबाच्या सहायाने आटोक्यात आणणे मुश्किल बनले. पसरलेली आग शेजारील चंदवाणी सिरॅमिकच्या दुकानालाही लागली. आणि दोन्ही दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…