Home राजकीय उद्धव ठाकरे कडून शिवसेना पक्ष,चिन्ह दोन्ही गेले : निवडणूक आयोगाचा धक्का

उद्धव ठाकरे कडून शिवसेना पक्ष,चिन्ह दोन्ही गेले : निवडणूक आयोगाचा धक्का

2 second read
0
0
34

no images were found

उद्धव ठाकरे कडून शिवसेना पक्ष,चिन्ह दोन्ही गेले : निवडणूक आयोगाचा धक्का

 मुंबई : राज्यातून शिवसेना पक्षाचे सभासदत्व असलेले लाखो प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करूनही शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.

याबात उद्धव ठकारे यांनी माध्यमाशी बोलताना संतप्त भावना व्यक्त केल्या हि गद्दरानी केलेली चोरी आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले, अशी तिखट टीका करीत ‘सगळे संपले असे नाही; आम्ही पुन्हा नव्याने सुरवात करू. मी खचलो नाही शिवसैनिकांनीही खचून जाऊ नये. महाराष्ट्रातील तमाम जनता आपल्याबरोबर आहे’.असे आवाहनही केले.  

निवडणूक आयोगाचा निर्णय अपेक्षित होता. निवडणूक आयोग असेल किंवा मग तपास यंत्रणा असेल हे कोणाच्यातरी गुलाम असल्यासारखं वागत आहेत. खोक्याचा वापर कुठपर्यंत होतो हे दिसून आलं, हा खोक्याचा विजय आहे. अशी प्रतिक्रिाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत.

 

शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…