Home सामाजिक अमृत संस्थेतर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण

अमृत संस्थेतर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण

5 second read
0
0
24

no images were found

अमृत संस्थेतर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण
कोल्हापूर,  : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृत ड्रोन मिशन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना या उपक्रमांतर्गत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

      आधुनिक तंत्रज्ञानाशी युवकांना जोडून त्यांना रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, सुरक्षा नियम, डिजिटल मॅपिंग, कृषी क्षेत्रातील ड्रोनचा वापर, हवाई सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण युवकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवत असून यामध्ये 25 जातींचा लक्ष्यित गटात समावेश असून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना संस्थेच्या योजनांचा लाभ घेता येतो.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://mahaamrut.org.in/ तसेच अभिजीत कुलकर्णी 9112228764, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), 250/बी 1 केव्हिज पार्क, हॉटेल पाटलाचा वाडा समोर नागाळा पार्क येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…