no images were found
“जेव्हा मला एखादा केस नीट समजून घ्यायचा असतो किंवा अधिक खोलात जाण्याची गरज भासते, तेव्हा मी माझ्या डॉक्टर असलेल्या बहिणींना सल्ला विचारतो.”: इक्बाल खान
मुंबई,: सोनी सबचा यादें प्रेक्षकांना हसवणारे क्षण, भावनिक नातेसंबंध आणि गुंतागुंतीच्या मेडिकल केससह सतत मनोरंजन देत आहे. जेबीएमएमसी हॉस्पिटलमध्ये दरवेळी येणाऱ्या रुग्णांच्या वेगळ्या लक्षणांमुळे आणि दुर्मिळ आजारांमुळे डॉ. देव मेहता (इकबाल खान) आणि त्यांची टीम नव्या आव्हानांना सामोरे जाते.
डॉक्टर एकत्र येऊन या गूढ केसचा शोध घेत असताना प्रेक्षकांनी पडद्यावर अनेक आकर्षक मेडिकल केस पाहिले आहेत. डॉक्टरची भूमिका इकबालसाठी नैसर्गिक असली तरी काही गुंतागुंतीचे मेडिकल टर्म्स आणि अनोखे आजार समजून घेणे त्याच्यासाठी कठीण ठरते. हे नीट समजून घेण्यासाठी तो खऱ्या आयुष्यात डॉक्टर असलेल्या आपल्या बहिणींशी संपर्क साधतो. एखाद्या सीनसाठी तयारी करताना जर एखादे क्लिष्ट निदान किंवा मेडिकल संकल्पना समोर आली तर इकबाल आपल्या बहिणींना विचारतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्याला मेडिकल टर्म्स समजायला मदत होते आणि डॉ. देवची भूमिका अधिक आत्मविश्वासाने साकारता येते. त्यांच्या सल्ल्यामुळे इकबालला केवळ गुंतागुंतीचे शब्द समजून घेता येत नाहीत तर त्याला डॉ. देव मेहता ही व्यक्तिरेखा अधिक विश्वासार्ह आणि खरी वाटेल अशा पद्धतीने साकारता येते.
“याबद्दल बोलताना इक़बाल खान यांनी सांगितले, “डॉक्टरची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूपच रोचक ठरले आहे कारण अधूनमधून असे मेडिकल टर्म्स आणि आजार समोर येतात जे मी कधी ऐकलेलेच नसतात. सुदैवाने माझ्या कुटुंबात दोन डॉक्टर आहेत – माझ्या बहिणी. जेव्हा मला एखादा केस नीट समजून घ्यायचा असतो किंवा अधिक खोलात जाण्याची गरज भासते, तेव्हा मी माझ्या बहिणींना सल्ला विचारतो. अलीकडे आम्ही जे मेडिकल केस दाखवत आहोत ते खूपच वेगळे आणि गुंतागुंतीचे आहेत, पण माझ्या बहिणी सगळं अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला भूमिका अधिक आत्मविश्वासाने करता येते आणि शिकण्याची प्रक्रिया मजेदार होते. कधी कधी मला वाटतं की त्या देखील या शोमध्ये माझ्याइतक्याच गुंतलेल्या आहेत!”