Home Uncategorized डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

0 second read
0
0
54

no images were found

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा 60 वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.

शिक्षण, कृषी सहकार सह विविध क्षेत्रात क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या डॉ. संजय डी पाटील व त्यांच्या स्नुषा सौ पूजा ऋतुराज पाटील यांना माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय. पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील यांनी शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर कुटुंबीयांकडून केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, सौ राजश्री ताई काकडे आमदार ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, सौ वृषाली पृथ्वीराज पाटील, अर्जुन व आर्यमन पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. संजय डी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी उपस्थिती लावली. यामध्ये अजितराव पाटील बेनाडीकर, मेघराज काकडे देवराज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ ए. एन. जाधव, गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (आबाजी), संचालक अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, डी वाय पाटील साखर कारखाना संचालक खंडेराव घाडगे व अन्य संचालक, गडहिग्लज कारखाना संचालक विद्याधर गुरबे, प्राचार्य डी आर. मोरे, प्राचार्य प्रताप पाटील, प्राचार्य व्हीं एम पाटील, प्राचार्य जे. के. पवार, क्रीडाईचे अजय डोईजड, सचिन ओसवाल, गौतम परमार, मार्केट कमिटी चेअरमन भारत पाटील भुयेकर, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, श्रीराम सोसायटी अध्यक्ष उमाजी उलपे व संचालक, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.रघुनाथ ढमकले, ऍड अजित पाटील, ऍड अभिषेक मिठारी, डॉ. सचिन पवार, विविध वृत्तपत्रांचे पत्रकार व अधिकारी, शिक्षण, सहकार, राजकीय, सामाजिक व औद्योगिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर व डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी प्राध्यापक कर्मचारी यांनी डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे डॉ. पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…