Home मनोरंजन कृष्‍णा देवीचे अथक प्रयत्‍न अटलला वाचवू शकतील का? 

कृष्‍णा देवीचे अथक प्रयत्‍न अटलला वाचवू शकतील का? 

1 min read
0
0
16

no images were found

कृष्‍णा देवीचे अथक प्रयत्‍न अटलला वाचवू शकतील का

अटल (व्‍योम ठक्‍कर)बेपत्ता होतो आणि कृष्‍णा देवी (नेहा जोशी)अज्ञात भागामध्‍ये बेशुद्ध होऊन हरवून जाते, ज्‍यामुळे मालिका ‘अटल’च्‍या आगामी एपिसोडला रोमांचक वळण मिळाले आहे. रागावलेला क्रिष्‍णन बिहारी (आशुतोष कुलकर्णी)तोमर व सुदर्शनला अटल आणि कृष्‍णा देवीचा शोध घेण्‍यास सांगतो, ज्‍यामुळे क्रिष्‍णन बिहारी आणि तोमर यांच्‍यामधील भांडण टोकाला पोहोचते. विमला घरामध्‍ये अवधला पाहते, ती त्‍याला विचारते की संपूर्ण कुटुंब तणावात असताना त्‍याला काळजी का वाटत नाही आहे. दरम्‍यान, प्रेम व सदा अवधला विचारतात की अटल बेपत्ता होण्‍यामागे त्‍याचा हात तर नाही ना? या एपिसोडबाबत अधिक सांगताना कृष्‍णा देवी ऊर्फ नेहा जोशी म्‍हणाल्‍या, “डोक्‍याला दुखापत झाल्‍यानंतर कृष्‍णा देवीला काही लोक खाटेवर ठेवतात. डॉक्‍टर कृष्‍णा देवीचा उपचार करतो आणि सर्वांना सांगतो की ती लवकरच शुद्धीत येईल. दादाजींना वाटते की अपहरणकर्त्‍यांनी तिच्‍यावर हल्‍ला केला असावा, पण क्रिष्‍णन बिहारी सांगतात की ती शुद्धीत आल्‍यानंतर सर्वकाही समजेल.” शुद्धीत आल्‍यानंतर कृष्‍णा देवी एका अपहरणकर्त्‍याचे स्‍केच बनवते. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, “कृष्‍णा देवीसोबत क्रिष्‍णन बिहारी तोमर आणि सुदर्शनचा सामना करतात. तोमर काही पुरावा असल्‍यास अटलचा शोध घेईल असे सांगतो, तेव्‍हा कृष्‍णा देवी त्‍याला एका हल्‍लेखोराचे स्‍केच देते. ती तोमरला अटलला शोधण्‍याचे त्‍याचे कर्तव्‍य बजावण्‍याची चेतावणी देते, अन्‍यथा ती कारवाईसाठी ग्‍वाल्‍हेरच्‍या राजाकडे जाईल. दुसऱ्या दिवशी कृष्‍णा देवी हातात मशाल घेऊन उभी राहते आणि घोषणा करते की राजाला अटल बेपत्ता झाल्‍याबाबत सांगितले पाहिजे. तोमर त्‍यामध्‍ये हस्‍तक्षेप करतो, पण ती काहीही झाले तरी राजाला भेटण्‍याचा आग्रह करते. ती राजाला भेटण्‍यासाठी पुढे जाते आणि अधिकाधिक लोक तिच्‍यासोबत सामील होतात. सुदर्शन तेथे येतो आणि तोमरला गोळीबार करण्‍याचा आदेश देतो. तोमर गोळीबार करणार असतानाच दादाजी त्‍याच्‍याकडून बंदूक हिसकावून घेतात आणि तोमरवर नेम साधतात. दरम्‍यान, अपहरणकर्त्‍यांना एका खरेदीदाराकडून पैसे मिळतात आणि अटलला जवळच्‍या रेल्‍वे स्‍टेशनवर घेऊन जाण्‍याचे ठरवतात.” कृष्‍णा देवी आणि तिचे कुटुंबिय अटलला वाचवण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतील का की अटलला ठार मारण्‍याची सुदर्शनची दुष्‍ट योजना यशस्‍वी ठरेल?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…