Home शासकीय एल.पी.जी.  सिलिंडरच्या दरात मोठी घट

एल.पी.जी.  सिलिंडरच्या दरात मोठी घट

0 second read
0
0
120

no images were found

एल.पी.जी.   सिलिंडरच्या दरात मोठी घट

मुंबई :  सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एल.पी.जी.  गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑइलने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर  91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पूर्वी हा सिलिंडर 1976.50 रुपयांना मिळत होता तर आजपासून या सिलिंडरसाठी 1885 रुपये द्यावे लागणार आहेत.

मे महिन्यात विक्रमी 2354 रुपयांवर दर पोहोचला होता. आता नव्या दरानुसार 19 किलोचा सिलिंडर दिल्लीत 1885 रु.ला झाला आहे. राजधानी दिल्लीत आता यासाठी 1976.50 ऐवजी 1885 रुपये तर कोलकात्यात 2095.50 ऐवजी 1995.50 रुपये, मुंबईत 1936.50 ऐवजी 1844 रुपये आणि चेन्नईमध्ये 2141 ऐवजी 2045 रुपये दर असेल. एल.पी.जी. गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट  झाल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…