no images were found
महाराष्ट्र पोलिसांसाठी डीजी कर्ज सेवा पुन्हा सुरु
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र पोलिसांना गणेशोत्सवात आनंदाची बातमी मिळाली आहे. कॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांना खात्यातूनच मिळणारी कर्ज सेवा पून्हा सुरू केली असून ही सेवा ठाकरे सरकारने काही कारणास्तव बंद केली होती. या माहितीनुसार, डीजी कर्ज खात्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
आता पोलीस कर्मचाऱ्यांना गृह विभागाकडूनच २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पोलिसांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. पोलिसांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.
विधानसभेत बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याची काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. यानंतर तत्काळ अंमलबजावणीही करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या ५ दिवसात शासन निर्णय मंगळवारी गृहनिर्माण विभागाने जाहीर केला. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
आता कॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांना खात्यातूनच मिळणारी कर्ज सेवा पून्हा सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीजी कर्ज खात्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यामुळे गणेशोत्सवात पोलिसांना फडणविसांकडून आनंदी वार्ता मिळाली आहे.