Home निधन वार्ता वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

0 second read
0
0
274

no images were found

वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

बीड : बीडच्या काळेगाव घाट गाव परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. एकीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाचा बीड जिल्ह्यासह राज्यात उत्सव सुरू असताना  दुसरीकडे शेतकरी कुटुंबातील महिलेवर काळाने घाला घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये वीज कोसळून ३५ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूसह अन्य जण जखमी झाले आहेत.

बीडच्या काळेगाव घाट या गावातील शेतकरी कुटुंबावर ऐन सणाच्या वेळी काळाने घाला घातला आहे. सदर गावात वीज कोसळून ३५ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. शीला आगे असं मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदला असतानाच महिला शेतकरी शिला आगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगे यांच्या मृत्यूने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने गावावर ऐन गणेशोत्सवात शोककळा पसरली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…