no images were found
एचडीएफसी सिक्युरिटीज तर्फे ग्राहकांना तोतयेगिरीच्या घोटाळ्यांपासून सावध राहण्याचा इशारा
कोल्हापूर,: एचडीएफसी बँकेची उपकंपनी आणि आघाडीची स्टॉक ब्रोकिंग कंपनी एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड तर्फे ग्राहकांना कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांची तोतयेगिरी करणाऱ्या बनावट व्हॉट्सॲप ग्रुप्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध करण्यात येत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज सर्व गुंतवणूकदारांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे. शेअर बाजारात सूचक, खात्रीशीर किंवा निश्चित परतावा देण्याचा दावा करणे हे बेकायदेशीर असून असा दावा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी सादर केलेल्या कोणत्याही योजनेचे किंवा उत्पादनाचे सदस्यत्व घेणे टाळावे असे नमूद करत आहे.
हे गट ग्राहकांना संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी आणि उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन निधी हस्तांतरित करण्यासाठी फसवू शकतात. युजर आयडी आणि पासवर्ड यांसारख्या ट्रेडिंग क्रेडेंशियल्सची मागणी करणाऱ्यांपासून एचडीएफसी सिक्युरिटीज त्यांच्या ग्राहकांना सावध करू इच्छिते.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीडीओ आणि सीओओ संदीप भारद्वाज यावर भर देत म्हणाले, “गुंतवणूकदारांनी फसव्या कारवायांपासून सावध राहणे आणि सखोल संशोधन आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारेच गुंतवणुकीचे निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजकडून आलो आहोत असा दावा करणाऱ्या कोणत्याही संवाद माध्यमाची सत्यता नेहमी तपासा आणि तुम्ही फक्त आमच्या अधिकृत चॅनेलद्वारेच व्यवहार करत आहात याची खात्री करा.”
एचडीएफसी सिक्युरिटीज व्हॉट्सॲप किंवा कोणत्याही अनधिकृत चॅनेलद्वारे आधार किंवा पॅन कार्ड तपशीलांसह वैयक्तिक माहिती मागवत नाही. शिवाय, ग्राहकांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड करत नाही किंवा अधिकृत प्लॅटफॉर्मच्या बाहेर निधी हस्तांतरणासाठी विनंती केली जात नाही.
सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, ॲप्स केवळ अधिकृत एचडीएफसी सिक्युरिटीज वेबसाइट किंवा अधिकृत ॲप स्टोअर्स सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडून डाउनलोड केले पाहिजेत. एचडीएफसी सिक्युरिटीज चे प्रतिनिधीत्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही संशयास्पद क्रिया किंवा गट ग्राहकांना आढळल्यास, त्यांनी नियुक्त केलेल्या ग्राहक सेवा संघाला त्वरित कळवावे.