no images were found
जागतिक संगीत व योग दिनानिमित्त संगीतसभेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): जागतिक संगीत व योग दिनानिमित्त शुक्रवार, दि. २१ जून रोजी शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने ‘योग संगीत’ या संगीतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फिजिकल- मेंटल-इमोशन्ल हेल्थ हीच खरी वेल्थ’ अशी संकल्पना घेऊन सादर होणार्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका व योगतज्ञ डॉ. भाग्यश्री ज्ञानेश मुळे, प्रसिद्ध हार्मोनियम व सिंथेसायझरवादक डॉ. श्री अरुण कुलकर्णी, प्रसिद्ध सतारवादक श्री. अजित कुलकर्णी आदी मान्यवर कलाकार सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्ष मा. प्रा. डॉ. डी. टी. शिर्के (कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) व प्रमुख उपस्थिती मा. प्रा. डॉ. पी. एस. पाटील व मा. डॉ. व्ही. एन. शिंदे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध आर. जे. व निवेदक श्री. मनिष आपटे हे करणार असून संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे श्री. प्रशांत देसाई श्री. संदेश गावांदे, श्री. विक्रम परीट साथसंगत करणार आहेत. प्रस्तुत कार्यक्रम संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहात शुक्रवार, दि. २१ जून रोजी दुपारी ३.०० वाजता संपन्न होणार असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्र. आधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे.