no images were found
साऊथ वेस्ट झोन अंतर विद्यापीठ वेट लिफ्टिंग महिला स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला उत्तुंग यश
साऊथ वेस्ट झोन अंतर विद्यापीठ वेट लिफ्टिंग महिला स्पर्धा दि. ०८ ते १२ डिसेंबर २०२३ रोजी आदिकवी अनन्या विद्यापीठ, राजमुद्री, आंध्र प्रदेश येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने १ सुवर्ण १ रौप्य व १ कास्य पदक मिळून यश संपादन केले. तसेच सर्व संघातील महिला खेळाडूंनी बेस्ट ऑफ ८ मध्ये स्थान मिळवून अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहे. तटगुंटी आरती राघवेंद्र (४९ गट अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले, सुवर्ण पदक) ढोणे अपेक्षा दत्तात्रय (४५ गट बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड, रौप्य पदक) साळुंखे प्राजक्ता मधुकर (७१ गट एल. बी. एस. महाविद्यालय, सातारा, कास्य पदक). वरील संघ प्रशिक्षक. डॉ. प्रशांत पाटील आहेत. व वरील खेळाडूंना मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, मा. रजिस्टर डॉ. व्ही. एन. शिंदे, मा. संचालक- क्रीडा अधिविभाग डॉ. शरद बनसोडे, व सर्व क्रिडा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.