Home मनोरंजन 69 वे फिल्मफेअर अॅवॉर्ड्‌स 2024 कार्तिक आर्यनने मंचाला अक्षरशः आग लावली!

69 वे फिल्मफेअर अॅवॉर्ड्‌स 2024 कार्तिक आर्यनने मंचाला अक्षरशः आग लावली!

22 second read
0
0
25

no images were found

69 वे फिल्मफेअर अॅवॉर्ड्‌स 2024 कार्तिक आर्यनने मंचाला अक्षरशः आग लावली!

वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षेतील आणि प्रतिष्ठित पुरस्कार संध्या, फिल्मफेअर अॅवॉर्ड्‌सच्या 69 व्या आवृत्तीने आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हल्लीच गुजरातमधील गिफ्ट सिटीमधील रेड कार्पेटवर ह्या अॅवॉर्ड्‌ससाठी सर्वोच्च सेलेब्रिटीज्‌नी आपली उपस्थिती लावली. ह्या पुरस्कार संध्येमध्ये सिनेमाच्या कलात्मक आणि तांत्रिक सर्वोत्तमतेचा सन्मान करत अनेक नावाजलेली व्यक्तिमत्त्वे, फिल्ममेकर्स आणि तंत्रज्ञांच्या प्रेरणादायी प्रवासाला पुरस्कृत करण्यात आले. एवढेच नाही तर ह्या मंचावर हिंदी सिनेसृष्टीतील एक से एक कलाकारांनी अफलातून परफॉर्मन्सेस सादर करत मंचाला अक्षरशः आग लावली. प्रथमच फिल्मफेअर अॅवॉर्ड्‌सचे प्रसारण झी वर करण्यात येत असल्यामुळे ह्या नेटवर्ककडे सगळ्‌यांचे लक्ष लागून राहिले आहे. 69 वे फिल्मफेअर अॅवॉर्ड्‌स 2024 रविवार, 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता झी टीव्ही, झी अनमोल, झेस्ट आणि झिंग वाहिन्यांवर प्रसारित करण्यात येतील.

कार्तिक आर्यनने वर्षभरातील काही मोठ्‌या हिट गाण्यांवर परफॉर्म केले. ट्रकवर उभे राहून त्याने मैं निकला गड्‌डी लेकेवर नृत्य केले, तर सलमान खानच्या लेके प्रभू का नाम गीतावर त्याने भव्य बाईक प्रवेश केला आणि शाहरूख खानच्या झूमे जो पठान आणि चलेया ह्या गाण्यांवरही तो थिरकला. भूल भूलैय्या 2, सुन सजनी, गुज्जू पटाका, दिल चोरी साडा हो गया अशा चित्रपटांच्या टायटल ट्रॅक्सवर त्याच्या डान्स मूव्ह्‌स पाहत गिफ्ट सिटीमधील मुलीसुद्धा ह्या गुज्जू पटाका कार्तिक आर्यनच्या तालावर नाचल्या. आपल्या परफॉर्मन्सच्या वेळेस प्रेक्षकांमधून धावत जाऊन ह्या हार्टथ्रॉब आपल्या चाहत्यांना थक्क करून सोडले.

कार्तिक आर्यन म्हणाला, फिल्मफेअरच्या मंचावर पुन्हा एकदा परफॉर्म करताना खरंच खूप मजा आली. ह्यावर्षी मी माझ्या काही लोकप्रिय गीतांवर आणि ह्या वर्षातील प्रेक्षकांना अतिशय आवडलेल्या काही गाण्यांवर नाचलो. गुजरातमधील प्रेक्षकांचा प्रतिसाद खरोखरीच अफलातून होता. झी वर 18 फेब्रुवारी रोजी ह्या अॅवॉर्ड्‌स शोमध्ये अख्ख्या देशाने आम्हांला पाहावे यासाठी मी उत्सुक आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…