no images were found
स्वच्छता मोहिमेत दोन टन माती, कचरा व प्लॅस्टिक उठाव
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरामध्ये दर शनिवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. आज शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहरातील मुख्य रस्ते, चौक, डिव्हाईडर यांची स्वच्छता करण्यात आली. सदरची स्वच्छता मोहिम इराणी खण ते शालिनी पॅलेस परिसर, जावळाचा गणपती रोड ते फुलेवाडी चौक, केएसबीपी चौक ते कावळा नाका, राजीव गांधी पुतळा, एसटी स्टॅण्ड ते दाभोळकर कॉर्नर चौक या परिसरामध्ये सकाळी 7 ते 9 या वेळेत मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत दोन टन माती, कचरा व प्लॅस्टिक उठाव करण्यात आला.
या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, रमेश कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांनी कर्मचाऱ्यांसमवेत या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. यासाठी 4 जेसीबी, 4 डंपर, 4 ट्रॅक्टर व 8 टिप्परचा वापर करण्यात आला. तसेच पवडी, उद्यान, नगररचना, जनसंपर्क विभाग, मुख्य लेखापाल विभाग, घरफळा, अतिक्रमण, परवाना, वर्कशॉप, विद्युत, पाणी पुरवठा विभागातील 300 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी सर्व विभागीय आरोग्य निरिक्षक, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.