no images were found
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन भारत दौऱ्यावर?
भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी व्यापार आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर या मुद्द्यांवर सुलिव्हन, जयशंकर आणि डोवाल यांच्यात व्यापक चर्चा झाली.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन २ दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटून अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील धोरणात्मक बाबीवर चर्चा घडावी असे या दौऱ्यामागील उद्दिष्ट आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन उच्च-स्तरीय चर्चेसाठी भारतात आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर सुलिव्हन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. यावेळी व्यापारापासून सुरक्षेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर व्यापक चर्चा झाली.
सुलिव्हन आणि डोवाल यांनी दहशतवाद विरोधी परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये बदलत्या हवामानानुसार सुरक्षेसाठी येणारी आव्हान काय असतात? या बाबींचाही समावेश होता. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी ही आमच्या नव्या कार्यकाळामध्ये जास्त ताकदीने पुढे जाईल, सुलिव्हन यांचा दौरा झाल्यामुळे तसे संकेतच मिळत असून, आमचा आशावाद वाढला असल्याचे मत परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी मांडले.
एनएसएने यादरम्यान सर्व यंत्रणांच्या प्रगतीचा आढावा घेतला, नव्या कल्पना आणि सुरक्षेबाबतच्या गोष्टींना अधिक चालना देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे.
कथित हत्त्यांच्या घटनांच्या कटावरून भारत-अमेरिका संबंधांमधील आव्हानांच्या दरम्यान सुलिव्हन यांचा हा दौरा विशेष ठरला आहे. ही एक नवी सुरुवात म्हणता येईल.
भारत अमेरिका मिळून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स , क्वांटम कॉम्प्युटिंग अशा नवा उदय होणाऱ्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेल. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी सुलिव्हन, जयशंकर आणि डोवाल यांच्यात व्यापार, सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली.