no images were found
भारती आचरेकर म्हणाल्या, ‘या मालिकेचे एवढे कौतुक होईल आणि जागतिक कनेक्शन मिळेल, असा विचारही मी केला नव्हता’
‘सोनी सब’ वरील ‘वागले की दुनिया- नई पीढी के नए किस्से’ ही विचारांना चालना देणारी कौटुंबिक मालिका यशस्वीरित्या ३ वर्षे पूर्ण करत आहे. या मालिकेत सामान्य लोकांचे जगणे आणि त्यांच्यासमोरील आव्हाने दर्शवण्यात आली आहेत. अत्यंत प्रासंगिक पात्र आणि जीवनातील शाश्वत सत्यांची ओळख करून देणाऱ्या या मालिकेतील प्रभावी कथानके आणि सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मने जिंकली आहेत.
भारती आचरेकर यांच्याशी चर्चा करताना त्यांनी वागळे कुटुंबातील ‘आत्मा’ असलेल्या राधिका या पात्राच्या भूमिकेविषयी अनुभव सांगितले. राजेशला मदत करणारी आई, वंदना हिच्या अडचणी सोडवणारी सासू, अर्थर्व आणि सखीची गमतीशीर आजी या रुपात राधिकाची भूमिका मालिकेत अत्यंत रंजक आहे. सीनियर वागळेंसोबत तिचे मजेदार किस्से तर अवर्णनीय आहेत.
त्याच मालिकेत पुनरागमन करण्याचा तुमचा अनुभव कसा राहिला? मालिकेच्या दोन्ही आवृत्तीत शूटिंगवेळी तुम्हाला काय बदल जाणवले?
मला आलेला सर्वात महत्त्वाचा अनुभव म्हणजे, ही मालिका आपल्या मूळ तत्त्वांशी निगडीत आहे. भूतकाळ आणि वर्तमान या दरम्यान अगदी सहज संबंध दाखवला जातो. सगळीच पात्र काळानुरूप वकसित झाली आहेत. पण बदलत्या काळानुसार आपल्यात बदल घडवणे, या गोष्टीला मी जास्त प्राधान्य दिले आहे. आधुनिकतेचा स्वीकार करत मी काळानुसार बदलत गेले. त्यामुळे माझे पात्र प्रत्येत वयोगटातील प्रेक्षकांसाठी प्रासंगिक झाले आहे. ‘वागले की दुनिया’ च्या नव्या आवृत्तीसाठी मी खूप आभारी आहे. यामुळे मला १९८८ च्या काळापर्यंतच मर्यादित ठेवले गेले नाही. त्याऐवजी मी आता मुलांना मोठे होत असताना पाहत आहे. मनोज परत आल्याने मनोज आणि राजूमधील मजबूत नाते अनुभवत आहे. पूर्ण सेटअप आणि सर्वांनी स्वीकारलेला नवा दृष्टीकोन खरोखरच प्रभावी आहे.
गेल्या काही वर्षांत, तुमच्या मते, राधिकाचे पात्र कसे विकसित होत गेले? हे पात्र साकारताना तुम्हाला नेमके काय अनुभव आले?
राधिकाचे पात्र काळानुसार समृद्ध होत गेले आहे. मालिका जशी जसी पुढे जात आहे, त्यात नवे पैलू समोर येत आहेत. राधिकाचे कुटुंबातील संपूर्ण समर्पण, सीनियर वागळेंसोबत तिची मजा मस्ती हे सर्वांपर्यंत विविध पैलूंसह जगणे हे माझ्यासाठी आनंददायी आहे. प्रेक्षकांना हे पात्र जास्त खूप आवडत असल्याचे पाहून मला आनंद होतोय. काही ठिकाणी प्रेक्षकांनी तर वयस्कर झाल्यावर राधिकासारखे होण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.
‘वागले की दुनिया’ या मालिकेची सध्याची कथा आणि विषयांवर तुमचे मत काय?
या मालिकेत रंजक कथांमधून महत्त्वपूर्ण विषय मांडले आहेत. कुटुंबाची प्रमुख म्हणून राधिका वागळेदेखील उत्त्म संतुलन साधत असते. लैंगिक समानता असो की कौटुंबिक आव्हाने असो, ही मालिका सामान्य माणसांच्या जीवनातील विविध विषयांना स्पर्श करते. त्यामुळे प्रेक्षकांमधील आवड टिकून राहते. तसेच त्यांना विचार करायला भाग पाडले जाते.
टीव्ही मालिका क्षेत्रातील तुमच्या अनुभवाविषयी सविस्तर सांगू शकता का? गेल्या काही वर्षांमध्ये कामाच्या बाबतीत तुम्ही कोण-कोणते बदल अनुभवले आहेत?
बदलत्या तंत्रज्ञानाने आपल्या काम करण्याच्या पद्धतीत क्रांती आणली आहे. यामुळे एक एपिसोड आता चार ऐवजी एकाच दिवसात पूर्ण करता येतो. यामुळे कामावर जास्त लक्ष देता येते. पण टीव्ही चॅनल्स जास्त झाल्यामुळे आता प्रेक्षकांना तत्काळ आकर्षित करणाऱ्या मालिकांची अपेक्षा असते. यामुळे कथानके, फॅशन तसेच सेटमध्येही बदल झालेत. कलाकार आता एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट घेतात. हे आधी शक्य नव्हते. यामुळे आमच्या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. अनेक गोष्टी अधिक रंजक आणि वेगाने पुढे जात आहेत.