स्वप्निल कुसाळे ठरला ऑलिम्पिक पदक विजेता !
स्वप्निल कुसाळे ठरला ऑलिम्पिक पदक विजेता ! कोल्हापूर( प्रतिनिधी ):-जगभरातील अव्वल नेमबाजपटूसोबत स्पर्धा, स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच खेळाडूंचे शर्थीचे प्रयत्न, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा अशा वातावरणात संपूर्ण देशवासियांच्या आशा-आकाक्षा सार्थ ठरवित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळने पॅरिस ऑलिम्पिकपद पदक जिंकले. गुरुवारी दुपारी रंगलेल्या या स्पर्धेत स्प्वनिलने कास्य पदकाचा निशाणा साधताच देशवासियांच्या आनंदाला भरते आले. फटाक्यांची आतषबाजी करत ठिकठिकाणी जल्लोष केला. …















