Home स्पोर्ट्स ‘जीतो,’ च्यावतीने अहिंसा रन रॅली ‘चे 31 मार्च रोजी आयोजन

‘जीतो,’ च्यावतीने अहिंसा रन रॅली ‘चे 31 मार्च रोजी आयोजन

8 second read
0
0
45

no images were found

‘जीतो,’ च्यावतीने अहिंसा रन रॅली ‘चे 31 मार्च रोजी आयोजन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :- जैन इंटर नॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ही सामाजिक स्तरावर कार्य करत असलेल्या संघटना आहे, आर्थिक सदृढता, ज्ञान, सेवा ही उद्दिष्ट ठेवून सपूर्ण जगात २६ ठिकाणी आणि भारतामध्ये ८५ शहरामध्ये कार्य करीत आहे. या संघटनेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने ३१ मार्च रोजी ‘अहिंसा रन रॅली” ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पोलीस ग्राऊंडवर पहाटे 5.30 वा. जीतोचे संस्थापक चेअरमन संजय घोडावत आणि व्हाईस चेअरमन नेमचंद संघवी यांच्यासह विविध मान्यवर ध्वज दाखवून याचा प्रारंभ करणार आहेत. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर चॅप्टर गिरीष शहा, अनिल पाटील आणि जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.
मनात असलेले अहंकार, राग, मत्सर, स्वार्थ असे दूषित विचारामुळे सर्वत्र हिंसाचार घडत आहेत. प्रत्येकाच्या मनातील दुषित विचारावर मात करण्यासाठी प्रेम, दया, क्षमा, शांती संदेश महत्वपूर्ण ठरतो. जगा व जगू दया या उपदेशा मधून अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होत आहे. आज या विचारांचा प्रसार होणेची मोठी गरज आहे. जगभर शांतता नांदावी व अहिंसेचा प्रसार व्हावा या उद्देशाने जीतो संघटनेचे जगातील २६ देशात आणि भारतात विविध शहरात ८० चॅप्टर वतीने अहिंसा रॅलीचे आयोजन केले आहे. यामध्ये ३-५ आणि १० किलोमीटर अशा तीन गटात ही रॅली संपन्न करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 31 मार्च २०२८ रोजी सकाळी ५.३० वाजता परदेशात २६ ठिकाणी व देशात ८० ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी लाखो लोक जगात शांतता आणि अहिंसा विचार घेऊन धावणार आहेत. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ मार्च २०२४ पर्यन्त आहे. ऑफ लाईन व ऑनलाइन फॉर्म भरून आपले रजिस्ट्रेशन करता येते. यासाठी Registration Link – https://registrations.indiarunning.com/ahimsa-run- kolhapur/www.ahimsarun.com व्दारे नोंदणी करता येणार आहे.
अहिंसा रन रॅली मध्ये १३ वर्षा वरील सर्वजण स्त्री पुरुष भाग घेऊ शकतात. कोल्हापुरच्या अहिंसा रन रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन कोल्हापूर नगरीतून प्रेमाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवू यासाठी जीतो कोल्हापूर परिवार सर्वांना आमंत्रित करीत आहेत. जगात आणि देशात एकाच दिवशी एकाच वेळी या रॅलीमध्ये लाखो लोक धावणार आहेत. या रॅलीचे नोंद गिनिज बुकमध्ये आणि लिम्का बुकमध्ये यावर्षी ही नोंद होईल असा संकल्प केला आहे. या रॅलीमुळे जगात शांतता आणि अहिंसा विचारांचा प्रभाव वाढेल. सर्वत्र शांततामय वातावरण निर्माण होईल हि भावना ठेऊन सर्व समाजातील लोकांनी एकजुटीने या अहिंसा रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जीतोच्या पदाधिकारी यांनी केले आहेत. या स्पर्धेच्या संयोजनासाठी चेअरमन गिरीष शहा ‘ रोम कनव्हेनर जितेंद्र राठोड , उपाध्यक्ष रवी संघवी ,मुख्य सचिव अनिल पाटील, खजानीस रमणलाल संघवी , सदस्य शितल गांधी ,महिला आघाडी च्या अधक्षा श्रेया गांधी सचिव माया राठोड , सह सचिव स्विटी पोरवाल – पूजा काले ,युवा आघाडीचे अध्यक्ष चिंतन राठोड , सचिव चिन्मय कर्णावट सह जयेश ओसवाल 100 हून अधिक जीतो कोल्हापूर चॅप्टरचे कार्यकर्ते डी.सी. प्लाझा दुसरा मजला महावीर कॉलेजसमोर असेंब्ली रोड या मुख्यालयातून कार्यरत आहे. ऑन लाईन सह अधिक माहिती आणि थेट सहभाग नाव नोंदणी या कार्यालयात भेट घावी असे आहवान ही संयोजक जीतो कोल्हापूर चॅप्टर यांनी केले आहे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…