
no images were found
डीकेटीइच्या एमबीए विभागामध्ये आंतरमहाविद्यालयीन ‘मॅनेज २०२४’ स्पर्धा संपन्न
इचलकरंजी : डीकेटीईच्या एम.बी.ए. विभागामार्फत एकदिवसीय ‘मॅनेज २०२४’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये फायनान्स, मार्केटींग, मनुष्यबळ विकास व बिझनेस स्टार्टअप या मध्ये आपले कौशल्य दाखविणे ही काळाची गरज असून अशा स्पर्धामधून सहभाग घेतल्यामुळे विद्याथ्यार्ंच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने या स्पर्धेचे अयोजन डिकेटीईमध्ये केले जाते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासोबत कर्नाटकातून विविध महाविद्यालयातून ३०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता.
प्रमुख पाहुणे दिपक डोडीया, पार्टनर, डोडीया ग्रुप ऑफ कंपनीस, डीकेटीईचे ट्रस्टी रवी आवाडे यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना, दिपक डोडीया यांनी प्रोजेक्ट इर्ंटनशिपचे महत्व, इंडस्ट्री इंटरऍक्शन कसे वाढवावे व टिकवावे तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. डीकेटीईचे ट्रस्टी रवी आवाडे यांनी विद्यार्थ्यांना वेगवगळया स्पर्धामधून होणारा फायदा व यशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी कोणकोणत्या गुणाची गरज आहे हे स्पष्ट केले व व्यवस्थापनाची कौशल्ये कशी आत्मसात करावी या विषयी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेमध्ये ‘स्मार्ट इन्व्हेस्टर’ इव्हेंट मध्ये दिग्वीजय कोकते, केआयटी, कोल्हापूर याने प्रथम क्रमांक तर ‘सेल्स गुरु’ मध्ये ध्रुव साखरे आणि टीम,डीकेटीई यांनी प्रथम क्रमांक मिळवला.‘मानस’ या मध्ये संजय रजपुत, व्ही.पी.कॉलेज, सांगली याने प्रथम क्रमांक तर ‘शार्क टँक’ या इव्हेंट मध्ये आर्यमन देसाई व टीम डीवायपी, कोल्हापूर यांनी प्रथम क्रमांक तर ‘बिझनेस क्वीझ’ मध्ये सुयश झुनके, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. जनरल चॅम्पियनशिप हा मान केआयटी कॉलेजला मिळाला.
या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, सर्व विश्वस्त, प्र.संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एमबीए विभागप्रमुख प्रा. पी.एस.जाधव, तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, प्रायोजक सहप्रायोजक यांनी मोलाचे परिश्रम घेतले.