no images were found
आहेर नको, पंतप्रधान मोदींना मत द्या.. हटके लग्नपत्रिका व्हायरल.
पुढच्या महिन्यात देशभरात लोकसभा निवडणुकांना सुरुवात होईल. तसेच पुढच्या महिन्यापासून लग्नसमारंभाचे बारही मोठ्या प्रमाणात उडतील. याच पार्श्वभूमीवर एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हैदराबादमधली संगारेड्डी जिल्ह्यातील एका वडिलांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी पाहुण्यांना आमंत्रित करताना एक खास विनंती केली आहे. त्यांनी लग्नात भेटवस्तू देऊ नयेत असे सांगितले आहे. पण थांबा. त्याबदल्यात त्यांनी एक अनोखी भेट मागितली आहे. एका भाजप समर्थकाने चक्क लग्न पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे लग्नाची निमंत्रण पत्रिका. लग्नाच्या दोन महिन्यापूर्वी निमंत्रण पत्रिका छापली जाते. बरेच वेळा वधु-वर आपल्या लग्…