no images were found
कोल्हापुरात नवोदित व अनुभवींसाठी विविध बुद्धिबळ प्रशिक्षणाचे उपक्रम
कोल्हापूर :- चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने व भीमा हेल्थ झोनच्या सहकार्याने बुद्धिबळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात 13 एप्रिल ते 13 मे दरम्यान नवोदित व अनुभवींसाठी बुद्धिबळ प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.
भीमा हेल्थ झोन (शाहू जलतरण तलाव) माळी कॉलनी,टाकळा, कोल्हापूर येथे सुरू होणाऱ्या या उपक्रमात सुरुवातीला नवोदितांसाठी मोफत दोन दिवसात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाची ओळख करून देण्यात येणार आहे.यामध्ये बुद्धिबळाचा इतिहास,उगम,चाली,नियम व बुद्धिबळाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.या शिबिरामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बुद्धिबळपटू घडविणारे अनुभवी तज्ञ प्रशिक्षक व पंच मार्गदर्शन करणार आहेत.साधारण पाच वर्षावरील सर्व मुला-मुलीना या उपक्रमात सहभागी होता येईल..मर्यादित प्रवेश असल्यामुळे प्रथम येणाऱ्या फक्त 50 मुलांना सहभागी करून घेतले जाईल.
बुद्धिबळाची ओळख झाल्यानंतर प्राथमिक प्रशिक्षण वर्ग होणार आहे. त्यानंतर एक मे पासून माध्यमिक व प्रगत प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे.त्याचबरोबर रविवार दिनांक 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी हा साधारण 25 प्रशिक्षणार्थी बुद्धिबळपटूंशी एकाच वेळी सामना खेळणार आहे.शेवटी 13 मे रोजी प्रशिक्षणार्थीमध्ये वयोगटानुसार बुद्धिबळ स्पर्धा घेऊन बक्षिसे दिली जाणार आहेत.असा संपूर्ण एक महिन्याचा बुद्धिबळाच्या विविध प्रशिक्षणाचा उपक्रम राबवला आहे.नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी छत्रपती शिवाजी स्टेडियम मधील बुद्धिबळ संघटनेचा हॉल येथे संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत संपर्क साधावा..
1)भरत चौगुले :- 7620067251
2) उत्कर्ष लोमटे :- 9923058149
3) मनिष मारुलकर:- 9922965173
4) प्रीतम घोडके :- 8208650388
5) अनिश गांधी :- 9096534074
6) आरती मोदी :- 8149740405