no images were found
आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट-निप्पॉन इंडियाचा फोंडातील मडकई गावात खारफुटी संवर्धन प्रकल्प सुरू
गोवा : आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट (एकेएएच) इंडियाने गोव्यातील फोंडा तालुक्यातील मडकई गावात हवामान बदलाशी जुळवून घेणारा जैवविविधता आणि पर्यावरणपूरक प्रकल्प सुरू करत असल्याची घोषणा केली. निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या सहकार्याने हा प्रकल्प सुर करण्यात आलेला आहे. पर्यावरण-आधारित आणि समुदाय-केंद्रित दृष्टीकोन वापरून खारफुटीचे पुनर्संचयन करणे त्याचबरोबर त्याचे संरक्षण करत किनारी प्रदेशातील समुदायाशी संबंधित संवेदनक्षीलता आणखी वाढवण्यासाठी हवामान बदलाशी अनुकूलतेवर हा प्रकल्प प्रामुख्याने केंद्रित केलेला आहे.
निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे समर्थन असलेला हा प्रकल्प फोंडा भागातील किनारपट्टीच्या गावांमध्ये सुमारे २ दोन लाख २५ हजार खारफुटी झाडांची लागवड करत आहे. ही लागवड किनारपट्टी भागातील समुदायाच्या नेतृत्वाखालील केली जाणार आहे. या प्रकल्पातून राबविल्या जात असलेल्या निसर्गपूरक उपाययोजना चक्रीवादळ, वादळ, किनारपट्टीची धूप, समुद्राची पातळी वाढणे आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या हवामान बदलाची आव्हाने पेलत मानव जातीसमोरील चिंता कमी करतो, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून आणि वातावरणातील कार्बन शोषक म्हणून काम करून दीर्घकालीन प्रभावांना हा प्रकल्प पाठबळ देत जाईल.
स्थानिक समुदायासाठी हा प्रकल्प एकात्मिक आपत्ती जोखीम कमी करताना आणीबाणीला तोंड देण्यासाठी सर्वांची सज्जता तयार करणे, शाश्वत बदलासाठी एक महत्त्वाचा घटक या दृष्टीकोनातून एकत्रित क्षमता निर्माण करणे त्याचबरोबर समाजात जागरूकता वाढविणे यासारख्या उपक्रमांचा यात समावेश आहे.
पंतप्रधानांच्या १०- कलमी कार्यक्रमाशी हा उपक्रम मिळताजुळता आहे. हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना (२००८), राज्य कृती योजना आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या जैवविविधतेवरील व्यापक कृती योजनेला हा उपक्रम पाठबळ देतो,
या भागीदारीबद्दल बोलताना आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रेरणा लंगा म्हणाल्या, “किनारपट्टीच्या हवामान परिसंस्थेची लवचिकता बळकट करण्यासाठी आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या मिशनच्या माध्यमातून सतत होत असलेल्या प्रगतीचे निरीक्षण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमचे हे मिशन पर्यावरणीय आवश्यकतेच्या पलीकडे असून किनारपट्टी भागातील पर्यावरण लवचिकता मजबूत करण्यासाठी आमच्या दृढ समर्पणाचे प्रतीक आहे. निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडसोबतचे आमचे हे पर्यावरणपूरक सहकार्य नाविन्यता आणि पर्यावरणाच्या शाश्वततेबाबत आमची बांधिलकी अधोरेखित करते. आमच्या या धोरणांना निसर्गाशी संबंधित उपायांची जोड देत आम्ही हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या प्रयत्नांना समर्थन देत आहोत, त्याचबरोबर आम्ही जैवविविधतेला प्रोत्साहन देताना भूतलावरील पर्यावरणाच्या दीर्घकालीन आरोग्याची सुध्दा काळजी घेत आहोत.”