Home स्पोर्ट्स व्हन्नुरचे माजी आमदार दौलतराव निकम स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा आदित्य सावळकर व जयसिंगपूरची दिशा पाटील अजिंक्य 

व्हन्नुरचे माजी आमदार दौलतराव निकम स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा आदित्य सावळकर व जयसिंगपूरची दिशा पाटील अजिंक्य 

2 second read
0
0
26

no images were found

व्हन्नुरचे माजी आमदार दौलतराव निकम स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा आदित्य सावळकर व जयसिंगपूरची दिशा पाटील अजिंक्य 

व्हन्नूर :- कागलचे माजी आमदार व स्वातंत्र्य सेनानी कै.दौलतरावजी आप्पाजी निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी ग्रामसेवा मंडळ व्हन्नुर ने आयोजित केलेल्या भव्य खुल्या व पंधरा वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
दौलतरावजी निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर, ता कागल येथे या स्पर्धा खुल्या व पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात स्वतंत्रपणे स्विस् लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सात फेऱ्यात घेण्यात आली.
खुल्या गटात अंतिम सातव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर पाचवा मानांकित कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने अग्रमानांकित मुंबईच्या अमरेंद्र रॉयचा पराभव करत साडेसहा गुणासह अजिंक्यपद पटकाविले.आदित्यला विजेतेपदाचे रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविले. दुसऱ्या पटावर आठव्या मानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने अकरावा मानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरवर मात करुन सहा गुणांसह उपविजेतेपद पटकाविले.दिव्याला रोख तीन हजार रुपये चषक देऊन सन्मानित केले.तिसऱ्या पटावर द्वितीय मानांकित रेंदाळच्या श्रीराज भोसलेने चौदावा मानांकित मिरजेच्या अभिषेक पाटील वर विजय मिळवित साडेपाच गुणासह तृतीय स्थान निश्चित केले. व श्रीराज रोख दोन हजार रुपये व चषक चा मानकरी ठरला.
पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित जयसिंगपूरचे दिशा पाटील, आठवा मानांकित इचलकरंजीचा अथर्व तावरे व तृतीय मानांकित जांभळीचा अभय भोसले या तिघांचे अंतिम सातव्या फेरीनंतर समान सहा गुण झालेमुळे सरस टायब्रेक गुणांनुसार दिशाला अजिंक्यपद मिळाले तर अथर्व तावरेला उपविजेतेपदावर व अभय भोसले ला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.दिशाला रोख तीन हजार रुपये व चषक,अथर्वला रोख दोन हजार रुपये व चषक तर अभयला रोख एक हजार रुपये व चषक बक्षीस म्हणून देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभासाठी राजे विक्रमसिंह घाटगे कागल को- ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री एम पी पाटील व्हाईस चेअरमन श्री माळकर ,संस्था अध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम, दौलतराव निकम माध्यमिक विद्यालया व्हन्नूर,संस्था सेक्रेटरी श्री यशवंतराव निकम मुख्याध्यापक श्री व्ही जी पोवार, मुख्य स्पर्धा संयोजक रवींद्र निकम,आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारुलकर व आरती मोदी इ‌.मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ बक्षीस वितरण समारंभासाठी सदाशिव मंडलिक साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत गवळी,वि म बोते गुरुजी, संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनंदा निकम सेक्रेटरी यशवंतराव निकम, शाळेचे मुख्याध्यापक व्ही जी पोवार यांचे हस्ते करण्यात आला.
बक्षीस विजेते पुढील प्रमाणे
खुला गट 1)) आदित्य सावळकर कोल्हापूर 2) दिव्या पाटील जयसिंगपूर 3) श्रीराज भोसले रेंदाळ 4) ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर 5) अमृतेश रॉय मुंबई 6) रवींद्र निकम इचलकरंजी 7) मुदस्सर पटेल मिरज 8) सोहम खासबारदार कोल्हापूर 9) शंतनू पाटील कोल्हापूर 10) प्रणव पाटील कोल्हापूर 11) अरिन कुलकर्णी कोल्हापूर 12) अभिषेक पाटील मिरज 13) प्रथमेश लोटके इचलकरंजी 14) अनिकेत बापट सातारा 15) उमेश कुलकर्णी मुंबई 16) विल्सन क्रूज गोवा 17) शिवप्रसाद कोकणे मिरज 18) हर्ष शेट्टी सांगली 19) मिलिंद नांदले फलटण 20) सदानंद चोथे सांगली
साठ वर्षावरील उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू
1) रामचंद्र भट शिरसी कर्नाटक 2) माधवराव निकम इचलकरंजी
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
1) सृष्टी कुलकर्णी इचलकरंजी 2) रेशमा नलवडे इचलकरंजी
कागल तालुक्यातील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) गंगाराम निचल सेनापती कापशी

पंधरा वर्षाखालील मुलांचा गट
1) दिशा पाटील जयसिंगपूर 2) अथर्व तावरे इचलकरंजी 3) अभय भोसले जांभळी 4) शौर्य बगाडिया इचलकरंजी 5) रियार्थ पोद्दार इचलकरंजी 6) ईशान कुलकर्णी इचलकरंजी 7) सहर्ष टोकले सांगली 8) स्वरूप साळवे गडहिंग्लज 9) प्रथमेश व्यापारी कोल्हापूर 10) आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी 11) सर्वेश पोतदार कोल्हापूर 12) अन्वय भिवरे कोल्हापूर 13) स्पर्श लव्हाळे इस्लामपूर 14) आरुष ठोंबरे कोल्हापूर 15) रुद्र माने इचलकरंजी
उत्तेजनार्थ बक्षीसे
उत्कृष्ट मुली
1) संस्कृती सुतार नांदणी 2) सिद्धी बूबने नांदणी
सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) अवनीश बडवे इचलकरंजी 2) आरुष पाटील सर्वोदय
बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) वेदांत बांगड इचलकरंजी 2) अर्णव र्हाटवळ कोल्हापूर 3) अवनीत नांदणीकर सांगली
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) मृण्मयी गोसावी सांगली 2) मधुरा पाटील निपाणी 3) आदित्य कोळी इचलकरंजी
उत्कृष्ट कागल
1) प्रेम निचल सेनापती कापशी 2) स्वरूपा हजारे कागल 3) योगिता निकम कागल
उत्कृष्ट शाळा
1) प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर 2) दौलतराव निकम व्हन्नुर 3) पोतदार इंटरनॅशनल इचलकरंजी इंटरनॅशनल इचलकरंजी
उत्कृष्ट अकॅडमी
1) के पी ज् सांगली 2) केन चेस अकॅडमी इचलकरंजी 3) केडीसीए कोल्हापूर

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…