Home शैक्षणिक मिनी-मॅरेथॉनमध्ये डॉ. डेळेकर, डॉ. जगताप यांच्यासह तुषार शेळके, मनिषा पाटील विजेते

मिनी-मॅरेथॉनमध्ये डॉ. डेळेकर, डॉ. जगताप यांच्यासह तुषार शेळके, मनिषा पाटील विजेते

9 second read
0
0
24

no images were found

मिनी-मॅरेथॉनमध्ये डॉ. डेळेकर, डॉ. जगताप यांच्यासह तुषार शेळके, मनिषा पाटील विजेते

 

कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाअंतर्गत आज सकाळी झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत तुषार शेळके, मनिषा पाटील, डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. नीलांबरी जगताप यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक मिळविला. बास्केटबॉल स्पर्धेत क्रीडा व तंत्रज्ञान अधिविभागांनी तर रस्सीखेच स्पर्धेत रसायनशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागांनी विजेतेपद मिळविले.

शिवाजी विद्यापीठातील आजची सकाळ स्पर्धकांच्या उत्स्फूर्त आणि जल्लोषी प्रतिसादात रंगलेल्या मिनी-मॅरेथॉन स्पर्धेने प्रफुल्लित झाली. विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग दर्शविला आणि स्पर्धा अविस्मरणीय बनविली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.

या मिनी-मॅरेथॉन स्पर्धा विद्यार्थी, विद्यार्थिनी, विद्यापीठ कर्मचारी (पुरूष) आणि विद्यापीठ कर्मचारी (महिला) अशा चार गटांत पार पडल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रांगणातील पुतळ्यासमोरून या स्पर्धेचा प्रारंभ होऊन महिला वसतिगृह, पाच बंगला, दूरशिक्षण केंद्र, क्रीडा अधिविभाग, गेट क्र. ८, परीक्षा भवन, मुख्य प्रशासकीय इमारत, शिवपुतळा प्रदक्षिणा या मार्गे राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह असा मॅरेथॉनचा मार्ग होता. कुलगुरू डॉ. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. रामचंद्र पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे (कंसात अधिविभाग) असा- विद्यार्थी गट: तुषार शेळके (इलेक्ट्रॉनिक्स), तुकाराम मोरे (क्रीडा), सोपान घेरडे (भूगोल), जालिंदर बजबळकर (ग्रंथालय व माहितीशास्त्र), ओंकार येवले (वायसीएसआरडी) आणि आशितोष माने (तंत्रज्ञान).

विद्यार्थिनी गट: मनिषा पाटील (क्रीडा), प्रेरणा घोडके (तंत्रज्ञान), तृप्ती इंगळे (इंग्रजी), स्नेहल खामकर (सामाजिक वंचितता व समावेशन धोरण), ऋतुजा पाटील (भौतिकशास्त्र) आणि तेजश्री पाटील (भौतिकशास्त्र).

विद्यापीठ कर्मचारी (पुरूष): डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), डॉ. सत्यजीत पाटील (भौतिकशास्त्र), डॉ. एस.एन. सपली (तंत्रज्ञान), डॉ. एन.जे. वलेकर (रसायनशास्त्र), डॉ. ए.डी. गोफणे (प्राणीशास्त्र) व डॉ. एन.एल. तरवाळ (भौतिकशास्त्र).

विद्यापीठ कर्मचारी (महिला): डॉ. नीलांबरी जगताप (इतिहास), अनुप्रिया तरवाळ (स्टाफ नातेवाईक), अहोरी कुलकर्णी (स्टाफ नातेवाईक) आणि डॉ. भक्ती कुलकर्णी (तंत्रज्ञान).

दरम्यान, काल झालेल्या बास्केटबॉल स्पर्धेत पुरूष गटात क्रीडा अधिविभागाने प्रथम तर तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र अधिविभागाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. महिलांमध्ये तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम, तर अर्थशास्त्र अधिविभागाने द्वितीय क्रमांक पटकावला.

रस्सीखेच स्पर्धेत पुरूषांमध्ये रसायनशास्त्र अधिविभागाने अर्थशास्त्र विभागाला पराभूत करीत तृतीय क्रमांक मिळविला, तर महिलांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाने पर्यावरणशास्त्र विभागाला पराभूत करीत तृतीय क्रमांक मिळविला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…