
no images were found
स्वप्निल कुसळेच्या कांस्य विजयाचा येस बँकेने उत्सव केला साजरा
कोल्हापूर,( प्रतिनिधी ):- स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे येस बँकेने मनःपूर्वक अभिनंदन केले. स्वप्निलच्या विजयाने पॅरिस 2024 मध्ये नेमबाजीत भारताच्या पदकांची संख्या ३ वर गेली असून, ऑलिम्पिकमध्ये भारताने एकाच प्रकारात एकाच वेळी तीन पदके प्रथमच जिंकली आहेत. नेमबाजीत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारताचे हे पहिले ऑलिम्पिक पदक होते. स्वप्निलची प्रतिभा आणि समर्पणाने केवळ भारताचा अभिमानच वाढला नाही, तर पॅरिसमधील संपूर्ण भारतीय दलाला आणि देशभरातील लाखो इच्छुक खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.
टीम इंडियासाठी अधिकृत बँकिंग भागीदार आणि मुख्य प्रायोजक म्हणून, येस बँकेने चाहत्यांसाठी yesteamindia.com हे एक व्यासपीठ सुरू केले असून, येथे चाहते थेट ऑलिंपियन्सना त्यांच्या शुभेच्छा पाठवू शकतात. खेळाडूंना त्यांच्या समर्थकांशी जोडून त्यांचे सर्वोत्तम साध्य करण्यासाठी पाठिंबा देणे आणि त्यांना प्रेरित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्याने येस बँकेच्या क्रीडा प्रती बांधिलकी वर आधारित “मिलकर जितायेंगे” मोहीम, ऑलिम्पिक प्रतिभेला हातभार लावण्यात समाजाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकते. स्वप्निल कुसाळेचे यश हे त्याचे कुटुंब, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांकडून मिळालेल्या भक्कम पाठिंब्याचे, सामूहिक प्रयत्नांची ताकद दाखवून देणारे आहे.
क्रीडापटूंना मदत करण्याबरोबरच, येस बँकेने येस ग्लोरी बचत खाते लाँच केले आहे, जे ताज व्हाउचर, ऑर्थोपेडिक सल्ला, शून्य क्रॉस-करन्सी मार्क-अप, वैद्यकीय विमा, येस ग्लोरी गोल्ड डेबिट कार्ड आणि आंतरराष्ट्रीय लाउंज प्रवेश यांसारखे विशेष फायदे प्रदान करते. या उपक्रमामुळे खेळाडूंना त्यांच्या गरजांनुसार आर्थिक पाठबळ आणि फायदे मिळतील, याची खात्री होते.
शिवाय, येस बँक संपन्न लोकांच्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या बँकिंग उत्पादनांद्वारे कोल्हापुरातील समुदायांना सक्षम बनविते. येस ग्रँड्युअर, येस एलिट क्रेडिट कार्ड्स आणि येस फर्स्टसारखी उत्पादने त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या खास सेवा देतात.