Home स्पोर्ट्स नऊ वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी व सांची बजाज अजिंक्य

नऊ वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी व सांची बजाज अजिंक्य

28 second read
0
0
166

no images were found

नऊ वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी व सांची बजाज अजिंक्य

 

 कोल्हापूर (प्रतिनिधी) :- प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मधील स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या बुद्धिबळ हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत नऊ वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या.. चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने  विझार्ड चेस क्लब कोल्हापूर ने आयोजित केलेल्या या नऊ वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड बुद्धिबळ  स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूरच्या अद्वैत कुलकर्णीने सहापैकी सहा गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले तर वारणानगरच्या आदिराज डोईजड ने पाच गुणासह उपविजेतेपद मिळविले..

     मुलींच्या गटात इचलकरंजीची सांची बजाज पाच पैकी पाच गुण मिळवून अजिंक्य ठरली तर इचलकरंजीच्याच चार्मी शहा ने चार गुणासह उपविजेतेपद संपादिले. दोन्ही गटातील विजेत्यांना रोख एक हजार रुपये व चषक तर उपविजेत्यांना रोख पाचशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

      स्पर्धेचा बक्षीस समारंभ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी, राष्ट्रीय पंच आरती मोदी, रोहित पोळ, विजय सलग, सूर्यकांत चोडणकर व रवि आंबेकर उपस्थित होते.

     या स्पर्धेतून सोलापूर येथे 26 व 27 मे रोजी होणाऱ्या नऊ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवड करण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे 

 मुले 1)अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर 2) आदिराज डोईजड वारणानगर 

 मुली 1) सांची बजाज इचलकरंजी 2) चार्मी शहा इचलकरंजी

 इतर बक्षीस विजेते नऊ वर्षाखालील मुले :- 3) युवेन भिडे इचलकरंजी 4) ऋतुराज पाटील इचलकरंजी 5) अवनीश जितकर कोल्हापूर 6) सुदर्शन पाटील इचलकरंजी 7) आरुष पाटील गडहिंग्लज  8) अथर्वराज ढोले कोल्हापूर 9) मितांश माने कोल्हापूर  10) श्रीतेज वाली कोल्हापूर 

 सात वर्षाखालील उत्कृष्ट मुले 1) सौमित्र जोशी कोल्हापूर  2) स्वरित गवंडी कोल्हापूर 3) वृषांक माने कोल्हापूर

 नऊ वर्षाखालील मुली 3) शनया मालानी  इचलकरंजी 4) तनिषा चौगुले कोल्हापूर 5) कृष्णा पाटील कोल्हापूर  6) मनस्वी शिरगुरे नांदणी  7) भक्ती कोळी  जयसिंगपूर  8) परिणीता हंडल कोल्हापूर 9) अवनी सूर्यवंशी इचलकरंजी 10) नारायणी घोरपडे कोल्हापूर 11) अनया मारुलकर कोल्हापूर 12) प्रज्ञा सलगर इचलकरंजी 13) प्रतिष्ठा गीताजे जयसिंगपूर 14) अक्शा मुजावर कोल्हापूर  

 सात वर्षाखालील उत्कृष्ट मुली

1) जिजा व्यापारी कोल्हापूर

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…