
no images were found
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर साफसफाईच्या कामासाठी दरपत्रक सादर करावे
कोल्हापूर :- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व इमारती व सर्व परिसर स्वच्छता व साफसफाईच्या 6 महिन्याच्या कामासाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. या कामासाठी सेवा पुरवठादार यांनी दिनांक 30 डिसेंबर 2022 ते 9 जानेवारी 2023 या कालावधीत दरपत्रके सादर करावीत. कामाचे सविस्तर दरपत्रक नमुना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असून, कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयामधील टपाल शाखेत सिलबंद लखोट्यामध्ये दरपत्रक सादर करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी कळविले आहे.