कणेरी मठातील कर्नाटक भवनला शिवसेनेचा विरोध कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीसाठी पायाभरणी केली. या कर्नाटक भवनला शिवसेनेनं कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कणेरी मठातील कर्नाटक भवनला कडाडून विरोध केला आहे. वर्षानुवर्ष कर्नाटक सरकार सीमाभागातील …